Pandharpur  Saam TV
महाराष्ट्र

Pandharpur News: प्रसन्न महाराज बेलापूरकर यांचे हार्ट अटॅकने निधन, वारकरी संप्रदायावर शोककळा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे ते प्रमुख मानकरी होते.

साम टिव्ही ब्युरो

पंढरपूर : पंढरपुरात तरुण कीर्तनकार महाराजाचा हृदयविकाराने (Heart Attack) निधन झालं आहे. तरुण कीर्तनकाराच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रसन्न महाराज बेलापुरकर असं महाराजांचं नाव आहे.

वारकरी संप्रदायातील तरुण अभ्यासू असणाऱ्या ह.भ.प.श्री. प्रसन्न महाराज बेलापुरकर अवघ्या 30 व्या वर्षी निधन झाले आहे. वारकरी संप्रदायातील तरुण महाराजांचे निधन झाल्याने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे ते प्रमुख मानकरी होते. वारकरी संप्रदायातील अत्यंत तरुण, निस्पृह अभ्यासू अशी त्यांची ओळख होती. लहानपणापासूनच त्यांना वारकरी संप्रदायाची शिकवण होती. त्यांच्या फडावर होत असलेल्या कुटुंबाची सेवेची परंपरा त्यांनी जपली होती.

आज त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला होता. यामध्ये त्यांची प्राण ज्योत मालवली आहे. त्यांच्या पश्चात आई , भाऊ असा परिवार आहे. आज सायंकाळी पंढरपूरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT