Multiple organ failure: जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर दु:खाची लाट पसरली आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी दिनानाथ मंगेश्कर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनयाच्या कारकीर्दीत त्यांनी मराठीस हिंदी चित्रपटसृष्टी देखील गाजवली आहे.
अनेक चित्रपट असेही आहेत जिथे फक्त विक्रम गोखले यांच्या नावानेत तिकीट बारीवर गर्दी उफाळली होती. अशात विक्रम गोखले मल्टीपल ऑर्गन फेल्युअर सिंड्रोममुळे मृत पावले. आजकाल अनेक व्यक्तींचे एका पेक्षा जास्त अवयवय निकामी झाल्याने निधन होत आहे. त्यामुळे आज या बातमीमधून मल्टीपल ऑर्गन फेल्युअर याच आजाराची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
काय आहे मल्टीपल ऑर्गन फेल्युअर?
मल्टीपल ऑर्गन फेल्युअर म्हणजेच एका पेक्षा अधिक अवयव एकाच वेळी निकामी होणे. यात अपघात किंवा संसर्गजन्य रोग (disease) अशा विविध कारणांनी तुमच्या शरीरातील एकापेक्षा जास्त अवयव निकामी होतात. व्यक्तीच्या अंगातील रोग प्रतिकारकक्षमता कमी असेल तर या आजाराने अनेक अवयव निकामी होतात आणि व्यक्ती दगवते.
मल्टीपल ऑर्गन फेल्युअर आजाराची कारणे?
हा आजार होण्याचे कोणतेही एकच ठोस कारण नाही. यात प्रत्येक रुग्णासाठी विविध घटक कारणीभूत ठरू शकतात. जसेकी सेप्सिमार्फत तुमचा अवयव सिंड्रोल होतो. यात दुखापत, संसर्ग, पेशी अशी वेगवेगळी कारणे असतात. साइटोकिन्स या पेशी अशा आजारात महत्वाची भूमीका बजावतात. कारण या पेशींमध्ये रोगप्रतीकारक शक्ती जास्त आहे.
या अवयवयांना सर्वाधीक धोका
यात तुम्हाला रक्ताभिसरणावर परिणाम झाल्याचे जाणवते. शरीर सुजणे, स्नायू दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, लघवीच्या समस्या अशी याची लक्षणे दिसतात. तसेच हृदय, किडनी, मेंदू, यकृत, फुफ्पुस या अवयांवर याचा सर्वाधीक परिणाम जाणवतो.
मल्टीपल ऑर्गन फेल्युअरवर उपाय
यावर उपचार करून अनेक व्यक्ती ठिक झाल्या आहेत. यासाठी तुम्हाला असलेल्या व्याधी लगेचच तुमच्या लक्षात येणे गरजेचे आहे. यासाठी डॉक्टरांशी नीट संवाद साधावा. गेल्या २० वर्षांची आकडेवारी तपासली असता मल्टीपल ऑर्गन फेल्युअर या आजाराने मृतांच्या संख्येत घट होत चालली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.