Praniti Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Praniti Shinde Wealth : प्रणिती शिंदेंच्या नावे साडेसहा कोटींची मालमत्ता; ५ वर्षांत मालमत्तेत १.८१ कोटींची वाढ

Solapur Lok Sabha Constituency : सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याकडे सध्या ६ कोटी ६० लाख ७० हजार ४०२ रुपयांची मालमत्ता आहे.

Ruchika Jadhav

विश्वभूषण लिमये

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. अशात राज्यातील अनेक उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करतायत. उमेदवारी अर्ज दाखल करताना तिथे आपल्याकडे असलेल्या संपत्तीची देखील माहिती दिली जाते. त्यामुळे सर्वच उमेदवारांच्या संपत्तीची चर्चा होताना दिसतेय.

सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सध्या ६ कोटी ६० लाख ७० हजार ४०२ रुपयांची मालमत्ता आहे. २०१९च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत ५ वर्षांत १ कोटी ८१ लाख ४२ हजार १९२ रुपयांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

६० लाख ७० हजार ४०२ रुपयांची मालमत्ता

शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावे २०१९ मध्ये ४ कोटी ७९ लाख २७ हजार २१० रुपयांची मालमत्ता होती. तर २०२४ मध्ये त्यांच्या नावे सहा कोटी ६० लाख ७० हजार ४०२ रुपयांची मालमत्ता,संपत्ती असल्याचे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होते.

कोणत्याही बँकेचे कर्ज नाही

विशेष बाब म्हणजे आपल्या नावे एकही दुचाकी,चारचाकी नसल्याचेही त्यांनी त्यात नमूद केले आहे. २०१९च्या तुलनेत त्यांची बँकांमधील ठेवी तथा रक्कम जवळपास ३० लाख रुपयांनी कमी झाली आहे. तसेच आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावे कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याचे दिसून येते.

प्रणिती शिंदेंकडील संपत्ती

निवासस्थाने : दादर आणि सोलापूर (प्रत्येकी एक)

जमीन : ५ एकर ७० गुंठे

वाहने व वैयक्तिक कर्ज : नाही

दागिने : ३०० ग्रॅम

बँका - टपालमधील ठेवी ९९.५१ लाख रुपये

शेअरमधील गुंतवणूक : जवळपास १२ लाख रु.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

SCROLL FOR NEXT