Praniti Shinde News: Saamtv
महाराष्ट्र

Praniti Shinde : भाजप उमेदवाराला एकच प्रश्न विचारा, त्यांची बोलती बंद होईल; प्रणिती शिंदे थेट बोलल्या

Praniti Shinde on bjp News : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. तसेच सभांचाही धडाका लावला आहे. अशाच एका सभेत प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

विश्वभूषण लिमये

Praniti Shinde News :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकारण तापलं आहे. सोलापुरात काँग्रेस आणि भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. तसेच सभांचाही धडाका लावला आहे. अशाच एका सभेत प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

सोलापुरात काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी एका सभेत माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार घणाघात केला आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या, 'मतदान कामावर केलं पाहिजे. श्रीरामावर नाही. कर्म महत्वाचे आहे, धर्म नाही. भाजपचा उमेदवार तुमच्याकडे आल्यावर त्याला एकच प्रश्न विचारा, त्यांची बोलती बंद होईल. त्यांना मागील दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी काय केलं? असा प्रश्न विचारा. त्यावेळी तो खासदार तुम्हाला एक तर सुशीलकुमार शिंदेंनी काय केले असेल विचारेल'.

प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका

सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्यावरही प्रणिती शिंदे यांनी टीका केली. 'सोलापूरचे खासदार संसदेत बोलले असते तर सोलापूर, अक्कलकोटला पाणी मिळाले असते. त्यामुळे जे खासदार संसदेत बोलणार नसतील तर काय उपयोग? तुमच्यासोबत धोका, विश्वासघात झाला आहे, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

प्रणिती शिंदेंचा भाजपवर गंभीर आरोप

भाजपवर गंभीर आरोप करताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, 'भाजपला काही मुद्दे राहिली नाहीत. तेव्हा काहीतरी घडवतात. मागच्या निवडणुकीत पुलवामा घडले. त्यांचे अधिकारी म्हणाले पुलवामा घडवले. ते एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात. तुम्हाला त्यांची मानसिकता कळली पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचा काळ देशात आणा. अन्यथा देशाची वाईट परिस्थिती होईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

SCROLL FOR NEXT