कलेक्शन केलेला मग दाखवताना अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे. 
महाराष्ट्र

मग काय..! नगरमध्ये आहे विलक्षण मग संग्रहालय

सचिन आगरवाल

अहमदनगर ः आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी आपल्या स्टुडिओमध्ये एक आगळेवेगळे असे मग दालन सुरू केलंय. देश-विदेशातील वैशिष्ट्यपूर्ण असे दोन इंचापासून ते 20 लिटर क्षमता असलेले मग या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत.

मुंबईला जगप्रसिध्द कलाकार पाब्लो पिकासो यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन पाहण्यासाठी गेलेले प्रमोद कांबळे यांनी पिकासो यांच्या स्वाक्षरी असलेले मग त्या ठिकाणी विकत घेतला. त्यांना तिथूनच मग संग्रहाचा छंद जडला.Pramod Kambles Cup Collection in Ahmednagar abn79

धातू, सिरॅमिक, काच, टेरेकोटसारखे मग या ठिकाणी पाहायला मिळतात. सचिन तेंडुलकर, पंडित हरिप्रसाद चौरसिया, तबलावादन झाकीर हुसेन, उज्वल निकम, मंगेश तेंडुलकर अशा अनेक मान्यवरांच्या स्वाक्षरी असलेले मग इथे आहेत. अमेरिका, युरोप आणि अनेक ठिकाणी ते गेले असताना त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण मग शोधून काढले. त्यामुळे प्रमोद कांबळे यांच्या दालनाची समृद्धी वाढली आहे.

अहमदनगरचे मग कलेक्शन सर्वांसाठी खुले.

तब्बल 2500 मग एकत्र असणारे हे एकमेव दालन आहे. नगरकरांसोबतच पर्यटकांसाठी खुले आहे. संगीत ,नाट्य, चित्र, शिल्प, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांना स्पर्श करणारे मग या कलेक्शनमध्ये आहेत. त्यामुळे मगप्रेमींनी एकदा तरी अहमदनगरला येऊन प्रमोद कांबळे यांच्या या दालनाला भेट द्यावी आणि हा संग्रह एकदा तरी नक्की पाहायला हवा. Pramod Kambles Cup Collection in Ahmednagar abn79

कोण आहेत प्रमोद कांबळे

नगरमध्ये हे संग्रालय असले तरी प्रमोद कांबळे यांची ख्याती जागतिक पातळीवर आहे. मागच्या पिढीतील ते नामवंत शिल्पकार व चित्रकार आहेत. महावीर कला दालनात त्यांनी रेखाटलेली चित्र आजही नगरकरांसह महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी हत्ती, घोडे, उंट, ससा, कांगारू अशी बहुतांशी जंगली प्राणी हुबेहूब बनवले आहेत. हे प्राणी त्यांनी नगरकरांसाठी खुले करून दिले आहेत. नगरमधील तसेच बाहेरची मंडळीही तेथे सेल्फीसाठी येतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे.

Edited By - Ashok Nimbalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

Maharashtra Live News Update: मुंबई विमानतळ सीमाशुल्क मोठी कारवाई

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

SCROLL FOR NEXT