Barsu Refinery Project, Uddhav Thackeray, Pramod Jathar,
Barsu Refinery Project, Uddhav Thackeray, Pramod Jathar,  saam tv
महाराष्ट्र

Pramod Jathar On Uddhav Thackeray Barsu Visit : जे स्वत:चे प्रश्न साेडवू शकले नाहीत काेकणी माणसाचे कधी साेडवणार; उद्धव ठाकरेंच्या बारसू दाै-यावर प्रमाेद जठारांची टीका

अमोल कलये

Barsu Refinery News : रिफायनरी प्रकल्पामुळे लाखापेक्षा जास्त मुलांना रोजगार मिळेल. हा सावकारी नाही तर सरकारी प्रकल्प आहे. पूर्वी ज्यांनी विरोध केला. त्यातले अनेकजण आज बारसू प्रकल्पाच्या (barsu refinery project) समर्थनात आहेत. गद्दारी करून मुख्यमंत्री पद मिळवलं, त्यांनी स्वतः पत्र दिलं होतं, सरकार गेल्यानंतर यांची भाषा बदलली अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमाेद जठार (pramod jathar) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांंच्यावर केली. (Maharashtra News)

बारसूच्या रिफायनरीवरुन (barsu refinery marathi news) सुरु असलेल्या गदाराेळात आता भाजप नेते प्रमोद जठार यांनी उडी मारली आहे. त्यांना आज (मंगळवार) रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच या प्रकल्पामुळे काेकणी माणसाचा कसा फायदा हाेऊ शकताे याची माहिती दिली.

जठार म्हणाले रिफायनरी प्रकल्पामुळे लाखापेक्षा जास्त मुलांना रोजगार मिळेल. हा सावकारी नाही तर सरकारी प्रकल्प आहे. पूर्वी ज्यांनी विरोध केला, त्यांतले अनेकजण आज समर्थनात आहेत. गद्दारी करून मुख्यमंत्री पद मिळवलं, त्यांनी स्वतः पत्र दिलं होतं, सरकार गेल्यानंतर यांची भाषा बदलली.

उद्धव ठाकरेंच्या दाै-याबाबत जठार म्हणाले आमचं सांगणं आहे. 6 तारखेला नक्की या, पण एक दिवसासाठी नको, महिनाभरासाठी या. अडीच वर्षांत तुम्ही बाहेर पडला नाहीत, आज पुतना मावशीचं प्रेम दाखवताय. ते पत्र स्वतः तरी वाचा, जे आज तुम्ही नाकारताय. आधी स्वतःचे प्रश्न सोडवा, माताेश्रीतल्या जमिनीवरुन काेर्टात जावे लागले. ते आधी पाहा आणि मग कोकणात या असा टाेला जठार यांनी ठाकरेंना लगावला.

बाळासाहेबांनी कधी शब्द फिरवला नाही. शब्द पाळायचं सोडा अख्ख पत्रच गिळून टाकायचं काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे अशी टीका जठार यांनी केली. शरद पवार विकासाच्या विरोधात नाहीत, त्यांनीही विरोधकांशी चर्चा केली. सन 2024 ला खासदार विनायक राऊत खासदार नसतील याची काळजी कोकण नक्की घेईल असेही जठार यांनी नमूद केले.

दरम्यान सरकारने जमिनीचा भाव जाहीर करावा, माझी सरकारला विनंती आहे पुढच्या 4 ते 8 दिवसांत दर जाहीर करा असे जठार यांनी नमूद केले. ते म्हणाले त्यानंतर ज्यांना जागा द्यायची आहे ते देतील, ज्यांना नाही द्यायची दे नाही देणार. दूध का दूध पाणी का पाणी होईल

यावेळी जठार यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीकेची झाेड उठवली. ते म्हणाले विनायक राऊत यांनी एकतरी प्रकल्प आणला का ? आजतागायत किती जणांना त्यांनी रोजगार दिला. लोकांच्या समस्या मांडा. एनजीओंना पैसे देऊन भडकवण्याचं हे काम करत आहेत असेही जठार यांनी म्हटलं.

लोकांच्या समस्या बघण्यासाठी राहा कोकणात. आज राजन साळवी तुमच्या सोबत का नाहीत ? असा सवाल करीत जठार यांनी लोकांना पिसळवू नका. शिवसेनेने (ठाकरे गट) आणलेला एक प्रकल्प दाखवावा, कोकणी तरुणांशी खेळू नका. अशोक वालमच्या पाठीशी कोण आहे, चार कोटी रुपये कुठले खर्च केले. खासदार विनायक राऊत आणि अनंत गीते यांनीच हा प्रकल्प आणण्यासाठी सुरुवातीला पुढाकार घेतला होता असेही जठार यांनी म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tata आणि Citroen च्या दोन नवीन कार ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

405 लिटरची बूट स्पेस, 19 Kmpl मायलेज, जबरदस्त आहे Renault ची ही 5 Seater Car

Desi Jugad Viral Video: जबरदस्त देसी जुगाड! कारमध्येच लावली ऊसाच्या रसाची मशीन, VIDEO ची होतेय चर्चा

Viral Video: स्केटिंग करताना हिरोगिरी करणं पडलं महागात, तरुणाचे झाले असे हाल; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

kalyan Crime News : लग्नाला दिलेला नकार पोराला पचला नाही, रागाच्या भरात नको ते करून बसला!

SCROLL FOR NEXT