Senior leader Prakash Mahajan quits MNS 
महाराष्ट्र

Raj Thackeray Setback : राज ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, प्रकाश महाजन यांचा मनसेला जय महाराष्ट्र

Senior leader Prakash Mahajan quits MNS after long-standing discontent in Maharashtra politics : मनसेतील अनेक दिवसांची नाराजी अखेर उफाळून आली. संभाजीनगरमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून राज ठाकरे यांच्या पक्षाला मोठा फटका बसला आहे.

Namdeo Kumbhar

  • मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिला.

  • अनेक दिवसांपासून चालू असलेली नाराजी अखेर उफाळून आली.

  • संभाजीनगरमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे.

  • राज ठाकरे यांच्या पक्षाची ताकद कमी होणार असल्याची चर्चा.

  • महाराष्ट्रातील राजकारणात या घडामोडीमुळे खळबळ.

Prakash Mahajan resignation gives major setback to Raj Thackeray’s MNS in Sambhajinagar : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सर्वात मोठा राजकीय धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरातील दिग्गज मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. प्रकाश महाजन अनेक दिवसांपासून मनसेत नाराज होते. छत्रपती संभाजीनगरात हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जातोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसेला गळती लागली आहे. अनेक दिवसांपासून पक्षातील नाराजी व मतभेदांमुळे महाजन यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जातेय.

प्रकाश महाजन हे मनसेत २००६ पासून सक्रिय होते. राज ठाकरेंच्या सोबत त्यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. जुलै २०२५ मध्ये नाशिकच्या इगतपुरी शिबिरात त्यांना बोलावले नसल्याने नाराजी वाढली. त्याच महिन्यात ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात ते अडकले, पण पक्षाने दुर्लक्ष केले. त्यामुळे नाराजी आणखी वाढतच गेली. प्रकाश महाजन यांच्या रूपाने संभाजीनगरात मनसेला हा मोठा धक्का आहे. कारण महाजन हे स्थानिक नेते म्हणून प्रभावी आहेत. राज ठाकरे यांनी यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. हे प्रकरण मनसेसाठी महापालिका निवडणुकांपूर्वी धोकादायक ठरू शकते.

प्रकाश महाजन भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू, माजी खासदार पूनम महाजन यांचे काका आहेत. मनसेला जय महाराष्ट्र करतानाच प्रकाश महाजन यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. प्रकाश महाजन यांनी राजीनाम्याचं नेमकं कारणही स्पष्ट केलेलं नाही. माझं वय वाढलं आहे. काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात, त्यामुळे मी थांबायचं ठरवलं आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुर्मिळ तिबोटी 'खंड्या' चा वाचवला जीव!

Teacher Recruitment Scam: शिक्षणातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश! शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी|VIDEO

Maharashtra Live News Update: सोलापुरात पुन्हा एकदा तुफान पावसाला सुरुवात

Firing Case: दिशा पाटनीपासून ते सलमान खान पर्यंत; 'या' सेलिब्रिटींच्या घरावर कोण करतयं हल्ले?

Maratha VS OBC Conflict: नांदेडच्या रिसनगावात मराठा-ओबीसी वाद पेटला; आरक्षणाच्या लढाईमुळे गावात तणावग्रस्त वातावरण|VIDEO

SCROLL FOR NEXT