Prakash ambedkar news  saam tv
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: विरोधी पक्षाची अवस्था ही लकवा मारल्यासारखी, प्रकाश आंबेडकर यांची विखारी टीका

Prakash Ambedkar News: विरोधी पक्षाला लकवा झाल्याची टीका करत, तर राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट कॉपी केली असावी अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

Saam Tv

विजय पाटील, साम टीव्ही

सांगली: महाकुंभमेळावा हा लोकांचा भावनिक आणि वैयक्तिक प्रश्न आहे. या कुंभमेळाव्याचे उत्तरप्रदेशच्या योगी सरकारने नियोजन केले आहेत. पण ज्या पद्धतीने कुंभमेळ्याची जाहिरातबाजी चालू आहे, त्याचा निषेध आहे. या महाकुंभमेळ्यात 1 हजाराहून अधिक भविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला, हे अतिशय दुर्दैवी आहे. सरकारने फक्त 38 लोकांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे. असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, हिंदूसंघटनांना आवाहन आहे की, या लोकांचे अंत्यविधी कसे केले ते ही एकदा सांगावे. या सगळ्या घटना पाहता धर्माचे राजकारण हे देशाला धोक्याचे ठरणार आहे.विरोधी पक्षाने यावर आवाज उठवला पाहिजे.पण विरोधी पक्षाची अवस्था ही लकवा मारल्यासारखी झाली आहे. त्यातून त्यांनी सावरले पाहिजे आणि या हिटलरशाही सरकारचा विरोध करावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षाला केले आहे.

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट कॉपी केली असावी

छत्रपती शिवाजी महाराजांना राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली म्हणून भाजपचे नेते दंगा करीत आहेत. पण ही पोस्ट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच कॉपी केली असेल अशी खोचक टीका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला विश्वगुरु समजतात. पण पंतप्रधान मोदी अमेरिकेला जाऊन आल्यापासून ते आजपर्यंत शेअर मार्केट कोसळत आहे. तर अमेरिकन डॉलर महाग होत चाललेला आहे. शासनाकडे येणार जीएसटीचा ओघ कमी होत चालला आहे. आर्थव्यवस्थेवर हे मोठे संकट निर्माण झाले आहे.विरोधी पक्षाने या घसरत चाललेल्या आर्थिक परिस्थितीवर मौन पाळलले आहे. अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. आज ते सांगलीमध्ये मध्यमांशी बोलत होते.

छावा चित्रपट आपण अर्धाच पाहिला आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोन्ही राजांनी इतिहास निर्माण केला तो प्रेरणादायी आहे. पण त्यात अडकून राहण्याऐवजी स्फूर्ति घेऊन नवीन इतिहास निर्माण करण्याच्या मानसिकतेत मराठा समाजाने आले पाहिजे असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT