prakash ambedkar allegation on election commission Saam Tv
महाराष्ट्र

निवडणुकीतून पक्ष संपवण्याचा डाव, आंबेडकरांचा आयोगावर गंभीर आरोप

Prakash Ambedkar Targets Election Commission: इलेक्शन हे पक्ष संपवण्यासाठीचा डाव आहे, असं वक्तव्य करुन प्रकाश आंबेडकरांनी खळबळ उडवून दिलीय...मात्र हे वक्तव्य करण्यामागचं नेमकं कारण काय... आणि आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात कशी जुंपलीय..

Bharat Mohalkar

3 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुका जाहीर झाल्या... मात्र या निवडणुकांच्या माध्यमातून राजकीय पक्ष संपवण्याचा डाव सुरु असल्याचा खळबळजनक आरोपच प्रकाश आंबेडकरांनी केलाय.. तर पराभवाच्या भीतीने आरोप केले जात असल्याचा पलटवार मंत्री गिरीश महाजनांनी केलाय...

आंबेडकरांपाठोपाठ आदित्य ठाकरेंनीही मतदारयाद्यातील घोळ कायम असताना घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीवर आक्षेप घेतलाय... तर मतदारयाद्यातील घोळ न सोडवता निवडणूका कशा घेणार... असा सवाल उपस्थित केलाय.. त्याला उत्तर देतांना राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलंय...

हे सगळं एका बाजूला सुरु असतानाच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीप्रमाणे आता पुन्हा घोळ घालू नका म्हणत आमदार सत्यजीत तांबेंनी आयोगाला खोचक टोला हाणलाय... आता प्रकाश आंबेडकरांनीही आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यानं राज्य निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीत तरी पैशांच्या उधळपट्टीला आणि मतखरेदीला चाप लावणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

SCROLL FOR NEXT