Prajakta Mali Press Conference 
महाराष्ट्र

Prajakta Mali : सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अभिनेत्री प्राजक्ता माळीची मागणी

Prajakta Mali Press Conference: सुरेश धस यांनी इव्हेंट पॉलिटिक्सवर बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं. त्यावर प्राजक्तानं निषेध व्यक्त केला. त्यांनंतर जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.

Bharat Jadhav

बीडमध्ये इव्हेंट पॉलिटिक्स सुरू असल्याचं सांगताना आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यावर सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्राजक्तानं केली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ती बोलत होती. तसंच यावेळी सुरेश धस यांच्या वक्तव्याचाही तिनं निषेध नोंदवला.

बीडमधील सरपंच हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये इव्हेंट पॉलिटिक्स सुरु असल्याचं सुरेश धस म्हणाले होते. त्यावेळी धस यांनी प्राजक्ता माळीसह इतर कलाकारांचीही नावं घेतली होती. त्याचा प्रचंड त्रास झाला असून, निषेध नोंदवण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतल्याचं प्राजक्तानं सांगितलं. सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करताना, तसं केलं नाही तर, कायदेशीर कारवाईचा इशाराही प्राजक्तानं दिला.

'ज्या कुत्सितपणे टिप्पणी केलीय. प्रसारमाध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्याचा उपयोग केला आहे. हे वागणं या राजकारण्यांना शोभत नाही. प्रसारमाध्यमांसमोर कसं आणि काय बोलावं याचं भान या राजकारण्यांना नाही, असंही ती म्हणाली.

धस यांनी अलीकडेच बीडमधील प्रकरणावर भाष्य करताना प्राजक्ता माळीसह रश्मिका मंदाना, सपना चौधरी यांचीही नावं घेतली होती. अवैधरीत्या जमिनी बळकावून त्या पैशातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जात असल्याचा आरोप केला होता. यावेळी धस यांनी प्राजक्ताच्या नावाचाही उल्लेख केला होता. त्याला प्राजक्ता माळीने सणसणीत उत्तर दिलंय.

बीडमधील आमदार सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली, त्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. अत्यंत शांततेने, ट्रोलिंग, निगेटिव्ह कमेंट्सना सामोरे जातेय. या ट्रोलिंगला मूकसंमती अजिबात नाही. माझ्यासारख्या अनेक कलाकार महिलाही हतबल आहेत. हे शांत राहणं कुठं न कुठं आमच्यावर बेतलंय, असं तिनं निक्षून सांगितलं.

प्राजक्ता माळीचा संतप्त सवाल

एक व्यक्ती रागात बरळून जाते. दोन वाक्यांचे माध्यमांकडून हजार व्हिडिओ होतात. एका सेलिब्रेटिला वक्तव्य करायला भाग पाडलं जातं. पुन्हा बोलणं क्रमप्राप्त होते. ही चिखलफेक चालू राहते आणि महिलांची अब्रु निघत राहते. सगळ्यांचं मनोरंजन होते. हे होऊ नये, म्हणून मी यात पडले नाही. मी शांत बसणे पसंत केलं. मला असं वाटलं की हा विषय इतका खोटा आहे की त्याला काही आधार नाही. एका सांस्कृतिक कार्यक्रमात एक सत्कार सोहळ्याला काढलेला फोटो, एकमेव शब्द किंवा संभाषण त्यावर एवढी आवई का उठवावी? असा रोखठोक सवाल प्राजक्ता माळीनं केला.

'..म्हणून मी शांत बसले'

माझ्या चारित्र्यावर स्पष्टीकरण द्यावं लागतं, कारण लोकप्रतिनिधी टीका करतात. त्यावेळी ही वेळ आलीय. ही मंडळी जेव्हा चिखलफेक करते, त्यावेळी गांभीर्यानं घ्यायची वेळ येते, असंही ती म्हणाली. लोकप्रतिनिधी हजारो-लाखोंचं नेतृत्व करत असतो. त्यांना ते फॉलो करतात. तेच लोकप्रतिनिधी काही गोष्टींवर ठसा उमटवतात, ती खरी आहे हे भासवतात. तेव्हा ही बाब गंभीर होते. ती गोष्ट खोटी असेल तर, ती किती काळ टिकणार? किती महत्व द्यायचं? म्हणून मी शांत बसणे योग्य समजले. मी ज्या संचाबरोबर काम करते, महाराष्ट्रातील जनता, प्रेक्षक कुणीही माझ्यावर कधीही शंकेच्या नजरेतून पाहिलं नाही. सगळे मला म्हणाले. तू शांत राहा. धीरानं सामोरी जा, असंही प्राजक्ता म्हणाली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याआधी कामं केली. यापुढेही करत राहणार आहे. तो फोटोचा रेफरन्स जोडून कुणासोबतही नाव जोडणार का? असा थेट सवाल प्राजक्तानं केला. ही बाब अतिशय निंदनीय आहे. महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. त्यांनी कुत्सित वक्तव्य केलं. तुम्ही महिलांच्या कर्तृत्वावर शिंतोडे उडवताय. राजकारण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला मोठी होऊ शकत नाही का? या अशा प्रकारची टिप्पणी करून तुम्ही स्वतःची मानसिकता दाखवताय. ही अत्यंत खेदजनक बाब आहे, असंही प्राजक्तानं सुरेश धस यांना उद्देशून म्हटलं.

पुरूष कलाकार कधी गेले नाहीत का?

तुम्ही एक राजकारणी आहात, दुसऱ्या राजकारण्यावर टीका कुरघोडी करताय, त्या सगळ्यात तुम्ही कलाकारांना का खेचता? आमचा संबंध काय? बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यावर बोलताना, तुम्ही कलाकारांवर का घसरता. महिला कलाकारांची नावं का येतात? महिला कलाकारच का? पुरुष कलाकार कधी गेले का नाहीत तिथे? अतिशय कष्टानं त्या मोठ्या होतात, त्यांची प्रतिमा डागाळताय. हे कितपत योग्य आहे? अशी प्रश्नांची सरबत्तीच प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांच्यावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT