Bacchu Kadu, maharashtra legislative council graduate and teachers constituency, amravati news, Prahar Janshakti Party
Bacchu Kadu, maharashtra legislative council graduate and teachers constituency, amravati news, Prahar Janshakti Party Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'शिंदे - फडणवीसांना आमची किंमत नाही'; बच्चू कडूंची उघड नाराजी (पाहा व्हिडिओ)

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Prahar Janshakti Party News : आमदार बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती संघटना (Prahar Janshakti Party) व मेस्टा संघटना पदवीधर व शिक्षक निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले आहे. या निवणुकीबाबत भाजप - शिंदे गटाने प्रहारची दखल न घेतल्याने हा निर्णय घेतल्याचे आमदार कडू (Bacchu Kadu) यांनी स्पष्ट केले.

पदवीधर मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकांचा (maharashtra legislative council graduate and teachers constituency) कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) नुकताच जाहीर केला आहे. निवडणुक आयोगाने अमरावती मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यापासून ते या निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यंत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रहार संघटना व मेस्टा संघटना शिक्षक व पदवीधरचे राज्यातील पाचही जागा लढणार असल्याचे आमदार कडू यांनी जाहीर केले आहे. (Maharashtra News)

आमदार बच्चू कडू म्हणाले पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक भाजप - शिंदे गट सोबत लढणार होतो पण काेणीच दखल घेतली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रस्तावाची दखल घेतली नसल्याची नाराजी आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

त्यामुळेच आम्ही प्रहार संघटना आणि मेस्टा संघटना शिक्षक व पदवीधरचे राज्यातील पाचही जागा लढवणार आहाेत. त्यासाठी उमेदवार देखील जाहीर केले आहेत. या निवडणूकीसाठी (election) दोन वर्षात प्रचंड मेहनत घेतली आहे. दाेन लाख मतदार असल्याचा बच्चू कडूंनी दावा केला आहे. राज्यातील शिक्षक व पदवीधरचे पाचही उमेदवार उमेदवारी अर्ज भरतील नंतर काय होते ते बघून घेऊ असेही कडू यांनी नमूद केले.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

अमरावती (amravati) विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी नुकताच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

12 जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्रे सादर करणे.

13 जानेवारी नामनिर्देशन पत्राची छाननी.

16 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे

30 जानेवारीपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान.

2 फेब्रुवारी मतमोजणी.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT