'पोल्ट्री हब' नवापूरमध्ये Bird Flu च्या पार्श्वभूमीवर उपाय योजनांना वेग! SaamTvNews
महाराष्ट्र

'पोल्ट्री हब' नवापूरमध्ये Bird Flu च्या पार्श्वभूमीवर उपाय योजनांना वेग!

बर्ड फ्लू मुळे वर्षभरापूर्वी 9 लाख कोंबड्या व 60 लाख अंडी नष्ट करण्यात आली होती.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : ठाणे जिल्ह्यातील शहापुर मध्ये बर्डप्ल्युच्या (Bird Flu) शिरकावानंतर नंदुरबार जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. बर्डफ्लूच्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे उपाय योजना केल्या जात आहेत. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नवापूरमध्ये अवघ्या वर्षभरापुर्वी बर्डप्ल्युचा शिरकाव झाला होता. यामुळे 30 पोल्ट्री फार्म मधील जवळपास 9 लाख कोंबड्यांची 'कलिंग' प्रक्रिया राबविली होती. तर 60 लाख अंडी नष्ट करण्यात आली होती. शासनाच्या परवानगी नंतर ऑक्टोंबर 21 मध्ये याठिकाणचा पोल्ट्री व्यवसाय पुन्हा सुरु झाला असुन दिवसाकाठी आता पाच ते सात लाख अंड्याचे उत्पादन घेतलं जात आहे.

हे देखील पहा :

त्यामुळे याठिकाणी पोल्ट्री (Poultry) व्यवसायाचा विस्तार पाहता प्रशासनाने खबरादारीच्या उपाययोजना केल्या आहेत. सध्या पोल्ट्री मालकांची बैठक घेऊन पक्ष्यांवर बारीक नजर ठेवायला लावली असून कोणीही आता नवे पक्षी आणू नये यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. सध्या तरी नवापूर मधील कोणत्याही पोल्ट्री फार्मवर कोबंड्याचा (Hens) अनैसर्गिक मृत्यु झालेला नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात सर्वात मोठा पोल्ट्री हब असलेल्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील नवापूर (Navapur) तालुक्यातील व्यावसायिकांचे बर्ड फ्लूमुळे गेल्यावर्षी कंबरडे मोडले होते. त्यातून सावरत पोल्ट्री व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला असून, त्यातून उत्पादन सुरू झाले असले तरी संपूर्ण पोल्ट्री व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु न होताच महाराष्ट्रातील इतर भागात बर्ड फ्ल्यूचा धोका पाहता येथील पोल्ट्री मालकांकडून भीती व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT