potholes on road in parbhani auto driver demand collector to visit areas Saam Digital
महाराष्ट्र

रिक्षा व्यावसायिकाकडून जिल्हाधिका-यांना परभणी शहर दर्शनचे निमंत्रण, नेमकं काय म्हटलंय पत्रिकेत?

potholes on road in parbhani : आता जिल्हाधिकारी परभणी शहरातील खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून प्रवास करतील तेव्हाच नागरिकांना नवीन रस्त्यांचे दर्शन होईल अशी भावना नागरिकातून व्यक्त हाेऊ लागली आहे.

राजेश काटकर

परभणी शहरातील खड्डेमय रस्त्याला कंटाळून शहरातील एका रिक्षा चालकाने चक्क जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी परभणी दर्शन करण्याचे निमंत्रण दिले आहे. या निमंत्रणाची चर्चा परभणी जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे.

परभणी शहरातील रस्ते खड्यात आहे की खड्डे रस्त्यात आहेत हेच नागरिकांना आता कळेनासे झाले आहे. सततच्या खड्ड्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरुन प्रवास करणे कठीण झाले आहे.

या खड्ड्यांमुळे रिक्षा व्यावसायाला देखील माेठा फटका बसू लागला आहे. तसेच वाहनांचे देखील नुकसान हाेऊ लागले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांना कंटाळून संदीप खाडे या रिक्षा चालकाने जिल्हाधिकारी यांना परभणी शहर दर्शन असे पत्रिका छापून त्यावर आपली व्यथा मांडत रस्त्यावरुन प्रवास करण्याचे निमंत्रण दिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT