Santosh Deshmukh Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh : संतोष देशमुखांचा हादरवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट, हालहाल करून जीव घेतला, वाचून डोळ्यातून अश्रू येतील

Post-Mortem Report Revelations: संतोष देशमुख यांना मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये नराधमांनी कशापद्धतीनं संतोष देशमुख यांना मारहाण केली, हे अहवालातून समोर आलंय.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला ९० दिवस उलटले. काही दिवसांपूर्वी देशमुख यांना अमानूष मारहाणीचे फोटो दोषारोपत्रातून समोर आले होते. हे फोटो पाहताच लोकांची तळपायाची आग मस्तकात गेली होती. अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

आता दोषारोपत्रातून देशमुखांचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात त्यांच्या शरीरावर नराधमांनी कसे वार केले, याची सगळी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.

शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, संतोष देशमुख यांची हत्या ही जबर मारहाणीमुळे झाल्याचं समोर आलं आहे. देशमुख यांना नाकातून रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. मारहाणीमुळे देशमुख यांचं संपूर्ण शरीर काळं निळं पडलं होतं. त्यांच्या शरीरावर बहुतांश भागात गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत.

तसेच देशमुखांच्या हनुवटी, कपाळ दोन्ही गालांवर गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत. तसेच त्यांच्या पोटावर जखमा, नाकातून रक्त, छाती, गळ्यावर जखमा, बरगड्यांवर गंभीर स्वरूपाची मारहाण, डाव्या खांद्यावर तीव्र जखमा, दंड, कोपरा, मनगट, हाताच्या मुठीवरही गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळल्या आहेत.

मारहाणीमुळे हात, पाय आणि पोटावरही जखमा आढळल्या आहेत. मांडी, गुडघा, नडगी आणि बरगड्यांवर बेदम मारहाणीच्या जखमा आहेत. गंभीर स्वरूपाच्या मारहाणीमुळे संतोष देशमुख यांची पाठ काळी निळी पडली होती. नराधमांनी केलेल्या मारहाणीमुळे देशमुखांच्या शरीरात दोन ते अडीच लिटर रक्त गोठले होते. त्यांना अडीच ते तीन तास मारहाण सुरूच होती, अशी माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT