बीड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवा अशी मागणी गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई बोलताना केली होती. जर तुम्ही मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर आम्ही देखील लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा पठण करू, असा इशारा दिला होता. आणि त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात, एकीकडे अजाण सुरू असतांना दुसरीकडे हनुमान चालीसाचे लाऊड स्पीकर लावून पठण केले.
हे देखील पहा-
राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर दोन दिवसांनी बीडचे मनसे शहराध्यक्ष जुबेर सिद्दीकी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली.
त्या पोस्टमध्ये सिद्दीकी यांनी म्हटलं होतं की "मला दुःख या गोष्टीचं आहे की, मी ज्या नेत्यांच्या खांदे वर विश्वासा ने येणाऱ्या पिढीचा भविष्य बघत होतो. त्या नेत्याने राजकारणा पोटी महाराष्ट्र युवकांच्या हथाला काम न देता जातीय दगड सोपवले". अशी पोस्ट करत त्यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर एक प्रकारे नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी बीड शहराची बॉडी बरखास्त करत शहराध्यक्ष सिद्दीकी यांना बडतर्फ केलं. आणि त्यानंतर आता जुबेर सिद्दिकी यांनी, दोन समाजात द्वेष पसरवला जात आहे, असं म्हणत आपला राजीनामा जाहीर केला आहे. मात्र अद्याप तरी त्यांनी लिखित राजीनामा कोणाकडे सोपविला नाही.
दरम्यान राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मनसे मधील अनेक मुस्लिम पदाधिकार्यांच्या भावना दुखावल्या असल्याने, ते राजीनाम्याच्या पवित्र्यात असल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर अनेक मनसे पदाधिकारी आक्रमक झाले असून, अजान सुरू असताना अनेक भागांमध्ये हनुमान चालीसा लावली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.