Ganeshutsav 
महाराष्ट्र

Ganeshutsav : खड्डा खोदाल तर खिशाला मोठा खड्डा पडेल, गणेशोत्सवसाठी राज्य सरकारकडून नियमावली जारी

Ganeshutsav 2025 : बीएमसी आणि राज्य सरकारकडून गणेशोत्सवची तयारी सुरू करण्यात आली आहे. गणेश मुर्ती शाडूच्या मातीच्या की पीओपीच्या मुर्ती हा संभ्रम यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी तूर्तास दूर झाला आहे.

Namdeo Kumbhar

Ganeshutsav 2025 : गणेश मुर्ती शाडूच्या मातीच्या की पीओपीच्या मुर्ती हा संभ्रम यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी तूर्तास दूर झाला आहे. पीओपीच्या मुर्तीवर यंदा बंदी घालण्यात आली आहे. शाडूच्या मुर्ती तयार करणाऱ्यांना राज्य सरकारकडून मदतीचा हात दिला जाणार आहे. मोफत शाडू उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याशिवाय मंडप उभारण्यासाठीही मदत करण्यात येणार आहे. पण खड्डा खोदला तर प्रत्येक खड्ड्यासाठी २ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून तसे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेय.

बीएमसी आणि राज्य सरकारकडून गणेशोत्सवची तयारी सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक उत्सव सन २०२५ पर्यावरणपूरक पध्दतीने तसेच सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने, मुर्तीकारांना तात्पुरते मंडप उभारण्याकरीता व विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी/कर्मचारी इ. यांचे मार्गदर्शनाकरिता परिपत्रकाव्दारे जारी करण्यात आलेय.

परिपत्रकात नेमकं काय काय ?

१. मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल PIL 96 of 2024 मधील दिनांक ३०.०१.२०२५ रोजीच्या अंतरीम आदेशानुसार, पीओपी मुर्तीना पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला असून केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने दि. १२.०५.२०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका यांना दिलेले आहेत. यास्तव सदर आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

२. सार्वजनिक/खाजगी जागेवर, मुर्ती घडविण्याकरिता तात्पुरत्या स्वरुपात मंडप उभारणीकरीता, मंडप परवानगीची प्रक्रिया एक खिडकी योजनेव्दारे संगणकीय (online) प्रणालीमार्फत, https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर विभागीय सहाय्यक आयुक्त व परिमंडळीय उप आयुक्त यांचे मार्गदर्शनानुसार पार पाडण्यात येईल.

आयुक्त यांचे मार्गदर्शनानुसार पार पाडण्यात येईल.

३. मुर्तीकारांना पर्यावरणपूरक मुर्ती बनविण्यास प्रोत्साहन मिळावे याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुर्तीकारांना निःशुल्क मंडप परवानगी दिली जाईल.

४. सार्वजनिक / खाजगी जागेवरील मंडपांकरीता अर्ज सादर करतेवेळी गतवर्षीची मंडप परवानगी सोबत जोडण्यात यावी.

५. सार्वजनिक/खाजगी जागेवर मंडप उभारणीकरीता संगणकीय प्रणालीव्दारे नव्याने प्राप्त अर्ज व त्यासोबतची कागदपत्रे विभागीय कार्यालयाकडून छाननी करण्यात येतील, योग्य पूर्ततेनंतर स्थानिक पोलिस स्टेशन, वाहतूक विभागाचे 'ना-हरकत' संगणकीय प्रणालीव्दारे प्राप्त करण्यात येईल, परिमंडळीय उपायुक्त यांच्या मान्यतेनंतर, विभागीय सहाय्यक आयुक्त यांचेमार्फत मंडपाकरिता परवानगी देण्यात येईल.

६. मुर्तीकाराचे घर किंवा मूर्ती बनविण्याच्या जागा प्रकल्पबाधित झाल्यास, संदर्भाधीन परिपत्रकातील अटी शर्तीची पूर्तता होत असल्यास नवीन ठिकाणी पूर्वी इतक्या क्षेत्रफळाची परवानगी नव्याने अर्ज प्राप्त झाल्याप्रमाणे परिपत्रक क्र. एमडीएफ /४१८/जन, दि. १२.०५.२०१७ अन्वये देण्यात येईल.

७. गतवर्षीप्रमाणे, पर्यावरणपूरक मुर्ती घडविणा-या मुर्तीकारांना प्रोत्साहन देण्याकरिता, गणेशोत्सव २०२५ करिता विभागस्तरावरुन महापालिकेच्या उपलब्ध असलेल्या जागेनुसार प्रथम अर्जदारास प्राधान्य या तत्वावर केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडविणा-या मुर्तीकारांस आवश्यक ती जागा विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येईल (अर्जदार हा स्वतः मुर्तीकार असणे अनिवार्य आहे.) व सदर जागेवर मुर्तीकारांना सोयीसुविधा देण्याकरिता रुपये १० (दहा) लाख इतक्या रक्कमेची तरतूद प्रत्येक विभाग कार्यालयास करुन देण्यात येईल.

८. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता मुर्तीकारांना विनामूल्य शाडू माती उपलब्ध करुन देण्यात येईल. परिमंडळीय स्तरावर उप आयुक्त यांनी ठरविलेल्या एका विभागात सुयोग्य अशी जागा निवडून प्रति परिमंडळ १०० टन अथवा मागणीप्रमाणे आवश्यक तेवढी शाडू माती मुर्तीकारांना विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येईल. वाढीव मागणी प्राप्त झाल्यास उप आयुक्त आपल्या स्तरावर वाढीव शाडू माती खरेदी करु शकतील.

९. सार्वजनिक उत्सवातील सोयी सुविधांकरीता आवश्यक अतिरिक्त निधीबाबत निकड पडताळून, विभागीय सहाय्यक आयुक्त परिपत्रक क्र. प्रले/एफडीटी /१३, दिनांक १२.०१.२०२४ नुसार अतिरिक्त निधीकरीता कार्यवाही करतील.

१०. मुर्तीकारांसाठी मंडपाची परवानगी देताना, सदर परवानगी केवळ मुर्तीकारांसाठी असेल व सदर परवानगीचा उपयोग मुर्ती विक्री करिता केला जाणार नाही याबाबत सोबत जोडलेल्या परिशिष्ट -1/परिशिष्ट - ।। प्रमाणे स्वयंघोषित हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे.

११. सर्व संबंधित सहाय्यक आयुक्त मंडप परवानगीविषयी क्र. AMC/ES/4462/III Dt. 24.07.2015 रोजीचे धोरण तसेच परिपत्रक क्रमांक एमडीएफ /४१८/ जनरल दिनांक १२.०५.२०१७ यामधील मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज पार पाडतील.

१२. मुर्तीकारांना मंडप उभारण्यासाठी रस्ते / फूटपाथवर खड्डे खणण्यास प्रतिबंध असून खड्डे खणल्याचे आढळून आल्यास परिपत्रक क्र. AMC/ES/4462/III DT. 24.07.2015 अन्वये रु. २०००/- प्रती खड्डा याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

१३. अनुज्ञापन खात्यातील विविध परिपत्रकांचे तसेच जाहिरात नियमांचे पालन मुर्तीकारांमार्फत करण्यात यावे.

१४. "येथे केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडविल्या जातात" असा फलक, मंडपाच्या प्रवेश व्दारावरील दर्शनी भागात सुस्पष्ट दिसेल अशा रितीने प्रदर्शित करावा.

१५. उत्सवादरम्यान मूर्तीचे आगमन / विसर्जन सुकर होईल व स्थापनेदरम्यान मूर्तीचे स्थैर्य (Stability) अभंग राहिल एवढ्या उंचीची मूर्ती घडविण्यात यावी. संचालक (माहिती व तंत्रज्ञान) यांच्या कार्यालयामार्फत, मुर्तीकार मंडप परवानगी संगणकीय कार्यप्रणाली दि. १७.०२.२०२५ पासून दि. ०१.१०.२०२५ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT