Pooja Bhoir  Saam TV
महाराष्ट्र

ReelStar ACB Inquiry : रीलस्टार पूजा भोईर ACBच्या चौकशीच्या फेऱ्यात, विदेशवारीवर लाखो रुपये उधळले

ReelStar ACB Inquiry : पूजाच्या कोठडीत वाढ झाल्यानंतर तपासामध्ये तिने ‘शेअर्स घोटाळा’ करताना विदेश दौरा केल्याची माहिती पुढे आली.

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

Nashik News : अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या इन्स्टाग्रामवरील ‘रील्सस्टार’ आणि मराठी बालकलाकाराची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या संशयित पूजा विशांत भोईरने विदेशवारीवर लाखो रुपये उधळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता तिच्या बँक खात्यासह मालमत्ता आणि सर्व व्यवहारांची तपासणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरु केली आहे.

पूजाच्या कोठडीत वाढ झाल्यानंतर तपासामध्ये तिने ‘शेअर्स घोटाळा’ करताना विदेश दौरा केल्याची माहिती पुढे आली. त्यामध्ये केलेला खर्च, आलिशान कार आणि फ्लॅटसहित इतर व्यवहारांची पडताळणी आता सुरु आहे. (Nashik News)

अतुल सोहनलाल शर्मा यांनी सरकारवाडा पोलिसांत पूजाने तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार एप्रिल महिनाअखेरीस पूजा विशांत भोईर आणि विशांत विश्वास भोईर या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याआधी संशयित पूजावर मुंबईतही गुन्हा दाखल झाल्याने तिला पोलिसांनी अटक केली.

‘अल्गो ऑप्शन्स ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक केल्यास 7.7 टक्के मोबदला देण्याचे सांगत तिने अनेकांना गंडा घातला आहे. मुंबईत 16 लाखांचा अपहार केल्याचा गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर नाशिक पोलिसांनी तिची कोठडी घेतली आहे. तपासकामी उपनिरीक्षक रुपेश केदार यांच्या पथकाने ठाण्यातही चौकशी केली. (Crime News)

त्यानुसार पूजाच्या बँक खात्यांमध्येही बरेच व्यवहार आढळून आले आहेत. तिचा पती विशांत हा पसार झाल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. पूजाने अनेकांना फसवल्याच्या तक्रारी पुढे येत असून, त्यामध्ये नाशिक-मुंबईतील ‘बड्या’ लोकांचाही समावेश आहे. दरम्यान, पूजाने दिलेले चेकही बाऊन्स झाल्याचे समोर आले आहे. तिची मुलगी मराठी मालिकांमध्ये बालकलाकार असल्याने या शेअर्स घोटाळ्याला ‘हायप्रोफाइल’ वलय निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

पूजाला पोलिसांनी अटक करून तिच्या पती सह इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे. तसेच लोकांना नाशिक पोलिसांनी आवाहन केले आहे ज्यांची पूजाकडून फसवणूक झाली असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

Dnyanada Ramtirthkar : लगीन घटिका समीप आली! ज्ञानदाचा होणाऱ्या नवऱ्यासोबत पहिला PHOTO; थाटात पार पडला साखरपुडा

Rava Kesari Recipe: साऊथ इंडियन स्टाईल रवा केसरी हलवा कसा बनवायचा?

Street style sev puri chutney: शेवपुरीची स्ट्रीट स्टाईल चटपटीत आंबट गोड चटणी घरच्या घरी कशी बनवायची?

Ladki Bahin Yojana: ४० लाख लाडक्या बहिणींचा अपात्र होणार? ₹१५०० कायमचे बंद; तुमचं नाव तर नाही ना?

SCROLL FOR NEXT