Raj Thackeray Meets CM Devendra Fadnavis  Saam TV News
महाराष्ट्र

एकीकडे राज ठाकरेंची भेट, दुसरीकडे उद्धव ठाकरेंना फोन; खासदारांनी सगळंच सांगितलं

Political Buzz in Maharashtra: राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात फडणवीसांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. संजय राऊत यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देत विविध तर्क वितर्क मांडले.

Bhagyashree Kamble

  • राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

  • उपराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात फडणवीसांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

  • संजय राऊत यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देत विविध तर्क वितर्क मांडले.

  • टाऊन प्लॅनिंग व पार्किंग समस्यांवरही राज ठाकरेंनी चर्चा केल्याचे सांगितले.

आज सकाळपासूनच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ही भेट जवळपास एका तासापर्यंत सुरू होती. दरम्यान, फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील फोन करून संवाद साधला. खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संपर्क झाला आहे. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी फडणवीसांवर सोपवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांवर मोठी जबाबदारी

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपतीपद नेमकं कुणाला मिळणार, यासाठी रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी फडणवीस चर्चा करणार आहेत. एनडीएच्या उमेदरवाराला पाठिंबा देण्याबाबत चर्चेची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे भेटीवर राऊत काय म्हणाले?

राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीवर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'विरोधी पक्षातील नेते भेटायला गेले आहेत. त्यांच्यात काही चर्चा झाली असेल तर होऊ द्या. राज ठाकरे हे अनेकदा देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत. कदाचित आता ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील. यासह राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असेल', असं राऊत म्हणाले.

राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला

आज राज ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. टाऊन पार्किंग संदर्भात फडणवीसांसोबत चर्चा झाली असल्याचं राज ठाकरे म्हणाले. मुंबई, पुण्यासह नाशिक आणि इतर शहरांमध्ये पार्किंगची समस्या आहेत. याबाबतचा आराखडा फडणवीसांना दिला असल्याचं राज ठाकरे म्हणाले. कबुतर, हत्तीण यात सगळे अडकले आहेत, टाऊन प्लॅनिंगसंदर्भात कुणी काही बोलत नाही, याबाबत आराखडा फडणवीसांना दिला असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: पुण्यात फिरण्यासाठी आला, मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर गेला; तानाजी कड्यावरून दरीत पडून तरुण बेपत्ता

Maharashtra Live News Update : पुणे रेल्वे स्थानकावर चोऱ्या करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला पोलिसांनी दिल्लीतून घेतलं ताब्यात

हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर अगोदर शरीर तुम्हाला देतं 'हे' संकेत

Ganesh Utsav 2025 : लाडक्या गणूला नेमके २१ मोदकच का अर्पण केले जातात?

First iPhone: जगातील पहिल्या iPhoneची किंमत किती होती आणि कधी लाँच झाला?

SCROLL FOR NEXT