Maharashtra Local Body Election Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News : लेकीसाठी वडिलांचा राजकीय त्याग! भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंतांचा राजीनामा

Maharashtra Local Body Election : भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी त्यांची मुलगी शिवानी सावंत माने हिच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी पक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शिवानी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार असून या निर्णयामुळे सावंत कुटुंब चर्चेत आले आहे.

Alisha Khedekar

रत्नागिरीत भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिला राजीनामा

मुलगी शिवानी सावंत माने ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार

वडिलांचा राजीनामा पाहून लेकीच्या डोळ्यात अश्रू

सावंत कुटुंबाचा भावनिक आणि नैतिक निर्णय चर्चेत

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली असून निवडणुकांचे वारे वाहत आहे. यादरम्यानच लेकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बापानेच चक्क राजीनामा दिला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंतांनी राजीनामा दिला. ठाकरे गटाकडून मुलगी शिवानी सावंत माने नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याने त्यांनी राजीनामा दिला.

सावंत यांनी का दिला राजीनामा?

भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी काल मुलगी विरोधी पक्षामधून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असल्याने राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवला. आठ दिवसापूर्वी राजेश सावंत यांनी राजीनामा दिला. आज मी स्वतः भेटून राजीनामा देतो असं त्यांनी सांगितले. पार्टी या गोष्टीचा विचार करेलं असं त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी सावंत माने यांना वडिलांनी घेतलेल्या निर्णयानंतर आपले अश्रू रोखता आली नाही.

काय म्हणाले राजेश सावंत?

राजेश सावंत यांनी म्हटले की, माझी मुलगी शिवानी सावंत माने हिने उद्धव ठाकरे पक्षाकडे नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितली आहे. माझी मुलगी नगराध्यक्ष म्हणून निवडणुक लढणार आहे. महायुती होण्याची शक्यता आहे, अश्यावेळी पार्टीला फसवणं योग्य वाटतं नाही. आता युतीच्या बैठकांना जावे योग्य वाटतं नाही. राजकारणात नैतिकता ही महत्वाची आहे. वडील आणि मुलगी हे नातं वेगळचं असतं.

काय म्हणाल्या शिवानी सावंत?

शिवानी सावंत यांनी म्हटले की, वडिलांनी माझ्यासाठी राजीनामा दिला याचे मला दुःख आहे. माझ्या वडिलांनी राजीनामा दिला, ते माझ्यासाठी काहीही करू शकतात. निवडणुकीसाठीची आमची तयारी सुरू आहे. माझे वडील त्यांच्या पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहिले आहेत. उद्धव ठाकरे नेहमीच आमच्या पाठीशी उभे आहेत. माझ्या वडिलांच्या त्या कृतीला मी भावनेतून किंवा शब्दातून व्यक्त करू शकत नाही. आम्हीच जिंकणार असा विश्वास देखील यादरम्यान शिवानी सावंत हिने वर्तवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : कल्याणमध्ये मुलीला भेटायला आली, रिक्षाचालकाने महिलेला फसवले, तब्बल ₹३५०००० लाख लंपास केले

Zarine Khan Passes Away: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीचे निधन; राहत्या घरी अखेरचा घेतला श्वास

Maharashtra Live News Update: पदवीधर आमदार धीरज लिंगडे यांच्याकडूनच आदर्श आचारसंहितेचा भंग

Government Hospital : शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार! रुग्णांच्या जेवणात नासलेली अंडी आणि सडलेली फळे, नेमकं काय प्रकरण?

Pune News: पुण्यातील सर्वात मोठा जमीन घोटाळा, पार्थ पवारांना अडचणीत आणणारी शीतल तेजवानी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT