sangli, jat saam tv
महाराष्ट्र

Sangli News : शासनाच्या आदेशाची हाेळी... सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेत्यांच्या उपोषणास प्रारंभ

जत तालुक्यात पाण्याची वानवा निर्माण झाल्याने शेतकरी चितेंत पडले आहेत.

विजय पाटील

Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज (शुक्रवार) सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर सर्वपक्षीय नेते एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास बसले आहेत. यावेळी जत तालुक्याला दुष्काळ यादीत समावेश न केल्यामुळे उपाेषणकर्त्यांनी शासनाच्या आदेशाची होळी केली. (Maharashtra News)

दुष्काळ हा जत तालुक्याच्या पाचवीला पुजलेला आहे. जत तालुका १००% अवर्षणग्रस्त तालुका आहे. तालुक्यातील सर्व तलावांमधील सद्यस्थित शिल्लक पाणीसाठा ३% असून एकूण २७ तलावांपैकी १० तलावांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा म्हणजे कोरडे असून उर्वरित तलावामध्ये मृतसंचय पाणी साठ आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्रापैकी जीवनावश्यक अन्नधान्य पेरणी खरीप हंगामातील केवळ ५८ % झाली असून पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. रब्बी हंगाम पेरणी करणे शक्य नाही. तालुक्यातील पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, जनावरांना पाणी व चारा मिळणे दिवसेंदिवस बिकट होत आहे.

सध्या २५ गावांमध्ये २९ टॅकर द्वारे पाणी पुरवठा सुरु असून सध्यपरिस्थिती अशी असताना नागपूर येथील क्षेत्रीय सर्व्हेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजना केंद्राच्या मोबाईल ॲपद्वारे चुकीचे सर्व्हेक्षण झाल्याने जत तालुका दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी तालुक्यांमध्ये जत तालुक्याचा समावेश झालेला नाही.

तरी शासनाकडून वस्तुस्थितीचे सर्वेक्षण होऊन त्वरित जत तालुका दुष्काळ जाहीर करावा यासाठी जत तालुक्यातील तमाम जनतेमार्फत सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय सांगली समोर सुरु करण्यात आले आहे.

यामध्ये काँग्रेस आमदार विक्रमसिंह सावंत, भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट) बहुजन समाज पार्टी, रिपाई, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि ग्रामाथ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT