Lakhandur Bazar Samiti : लाखांदूर बाजार समितीचे दोन संचालक अपात्र, जिल्हा उपनिबंधकांनी धाडला आदेश

सखाेल चाैकशीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी संचालकांवर कारवाई केली.
krushi utpanna bazar samiti
krushi utpanna bazar samiti saam tv

- शुभम देशमूख

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन संचालकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. भंडारा जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे यांच्या आदेशान्वये लोकेश एकनाथ भंडारकर व रामभक्त वासुदेव मिसार या दाेन संचालकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. (Maharashtra News)

krushi utpanna bazar samiti
Udayanraje Bhosale News : शिवप्रेमींनाे ! प्रतापगड भेट सुखावह होणार : उदयनराजे भाेसले

लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन करतेवेळी एका संचालकाने बनावट ७/१२ अंतर्गत शेतकरी असल्याचा खोटा दावा केला होता. अन्य एका संचालकाची पत्नी व्यापारी असूनही सेवा सहकारी संस्थेअंतर्गत निवडणूक लढवून विजयी झाल्याचा आरोप होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या दोन्ही प्रकरणी बाजार समितीचे संचालक प्रमोद प्रधान यांनी भंडाराच्या जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली हाेती. या तक्रारीत चाैकशी अंती कडक कारवाईची देखील मागणी करण्यात आली होती. चाैकशी अंती भंडाराचे (bhandara) जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे यांनी निकाल देत लोकेश एकनाथ भंडारकर व रामभक्त वासुदेव मिसार या २ संचालकांना अपात्र घोषित केले आहे.

Edited By : Siddharth Latakr

krushi utpanna bazar samiti
Ravikant Tupkar News : मंत्र्यांना विमा कंपन्यांकडून पैसे जातात; रवीकांत तुपकरांचा माेदी सरकारवर गंभीर आराेप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com