Sanjay Raut News SAAM TV
महाराष्ट्र

Political News : दौंडच्या सभेत संजय राऊत करणार भाजप आमदाराची पोलखोल, ठाकरे गटाच्या आमदाराचं मोठं विधान

अशात आता संजय राऊत एका मोठ्या विषयावर पोलखोल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Daund news : दौंड तालुक्यात २६ एप्रिल रोजी खासदार संजय राऊत आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच संजय राऊत नेमकं काय बोलणार तसेच सुषमा अंधारे विरोधकांवर काय टीका करणार याकडे दौंडकरांचे लक्ष वेधले आहे. अशात आता संजय राऊत एका मोठ्या विषयावर पोलखोल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

(Political News)

विधीमंडळ हक्कभंग समितीचे अध्यक्ष तथा दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजप आमदार राहुल कुल यांच्या कारखान्यातील गैरव्यवहाराची पोलखोल या सभेत केली जाणार आहे. कागदोपत्री सर्व माहिती सादर करत ही पोलखोल केली जाणार असल्याची माहिती, आमदार तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात यांनी दिली.

खासदार संजय राऊत यांनी १३ मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भीमा साखर कारखान्यामधील गैरकारभाराच्या चौकशीची लेखी मागणी केली होती. तसेच यावेळी आमदार राहुल कुल यांच्यावर त्यांनी पाचशे कोटी रूपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप केले होते.

तसेच खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यावेळी कुल समर्थकांनी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची धिंड काढून प्रतिमा जाळल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे यावर दूध का दूध , पानी का पानी करण्यासाठी चौकशीला सामोरे जावे, असा टोला रमेश थोरातांनी लगावला होता.

भीमा पाटस सहकारी साखर कारखाना शेतकरी कृती समितीच्या वतीने ही सभा आयोजित करण्यात आली असून वरवंड (ता. दौंड) येथे २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सभा होणार आहे. खासदार संजय राऊत व सुषमा अंधारे सभेत पोलखोल करणार आहेत. दौंड तालुक्याचे भूमीपूत्र तथा पुण्यातील कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांचा देखील या वेळी सत्कार होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात भरदिवसा गोळीबाराचा थरार, पोलिस चौकीसमोर तरुणावर ३ गोळ्या झाडल्या

Maharashtra News Live Update: दादरच्या शिवाजीपार्कात विद्यार्थ्यांचं आंदोलन

Fasting Tips : उपवासाच्या दिवशी किती कप चहा प्यावा? जाणून घ्या योग्य प्रमाण

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो 'हे' काम अन्यथा २००० रूपये मिळणार नाहीत, महत्त्वाची अपडेट समोर

Gen Z इतरांपेक्षा वेगळे का आहेत? जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT