Sanjay Raut saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut Spit: संजय राऊत यांच्यावर मराठा समाज थुंकल्याशिवाय राहणार नाही; मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध

Political News: राऊतांच्या अशा कृत्यामुळे त्यांच्यावर मराठा समाज थुंकल्याशिवाय राहणार नाही, अशी खरमरीत टीका रमेश केरे यांनी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Sanjay Raut: शुक्रवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत संजय राऊतांना खासदार श्रीकांत शिंदेंविषयी एक प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी श्रीकांत शिंदेंचे नाव ऐकताच राऊतांनी थुंकलं होतं. त्यांच्या या कृत्यावरून राज्याचं राजकारण तापलेलं दिसत आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून देखील राऊतांच्या अशा वागण्याचा निषेध व्यक्त केला आहे. (Latest Political News)

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी म्हटलं आहे की, मराठा क्रांती मोर्चाकडून आम्ही संजय राऊत यांचा जाहीर निषेध करत आहोत. संजय राऊत यांनी मराठा मोर्चाला मूक मोर्चा म्हटलं होतं. आज विस्थापित कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाले आहेत. संजय राऊत आता अशा मुख्यमंत्र्यांवर आणि त्यांच्या मुलावर थुंकण्याची भाषा करतायत."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाला न्याय देत आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलांसोबत आहोत. राऊतांच्या अशा कृत्यामुळे त्यांच्यावर मराठा समाज थुंकल्याशिवाय राहणार नाही, अशी खरमरीत टीका रमेश केरे यांनी केली आहे.

अजित पवार अन् संजय राऊतांमधील वाकयुद्ध

संजय राऊतांच्या थुंकण्याच्या कृतीवरून अजित पवारांनी देखील त्यांना सल्ला देत संयम ठेवत तारतम्य राखलं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यांचा हा सल्ला राऊतांच्या पचनी पडला नाही. त्यामुळे धरणामध्ये **** पेक्षा थुंकणं कधी चांगलं असं म्हणत राऊतांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला.

खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला सांगोल्यात जोडे मारो आंदोलन...

खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे नाव घेत खासदार संजय राऊत थुंकल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांच्या निषेधार्थ सांगोल्यात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले जात आहे. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारला होता. यावेळी राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच थुंकले होते. त्यांच्या कृतीचा आज संपूर्ण राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT