Rupali Patil Thombare Saam Tv
महाराष्ट्र

Rupali Thombare : मोहित कंबोज यांच्या सुषमा अंधारेंवरील टीकेवरून रुपाली ठोंबरे आक्रमक; म्हणाल्या, त्यांच्या बायकोमध्ये राखी सावंत...

बायकोमध्ये राखी सावंत का दिसत नाही?, असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी विचारला आहे.

Dnyaneshwar Choutmal

Political News : सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी मोठी टीका केलीये. त्यांनी सुषमा अंधारे यांची तुलना बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतसोबत केली आहे. त्यांच्या या टीकेवर राष्ट्रवादीच्या नेत्या व प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी चांगलाच दम दिला आहे. बायकोमध्ये राखी सावंत का दिसत नाही?, असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी विचारला आहे. (Latest Marathi News)

कंबोज यांना सुषमा अंधारे जर राखी सावंत वाटत असतील तर त्यांना त्यांच्या बायकोमध्ये राखी सावंत का दिसत नाही? मोहित कंबोज यांना त्यांच्या बायकोमध्ये राखी सावंत दिसली पाहिजे, असा घणाघात रुपली ठोंबरेंनी केला. यानंतर जर कोणी असं बोललं तर त्यांची खैर नाही, अशा शब्दांत त्यांनी मोहित कंबोज यांना डाफरलं आहे.

मोहित कंबोज यांना जर शांत बसता येत नसेल तर त्यांनी तोंड गप्प ठेवावे. जर मोहित कंबोज यांनी तोंड गप्प ठेवलं नाही तर आमच्या महिलांचा राग काय आहे ते आम्हाला मुंबईत येऊन दाखवावे लागेल, असाही दम यावेळी त्यांनी दिला आहे.जर मी मुंबईत आले तर सत्ताधाऱ्यांच्या बापालाही घाबरणार नाही, अशी धमकीच त्यांनी दिली आहे.

नवनीत राणा यांच्यावर अत्याचार झाला नाही

नवनीत राणा यांना जर हनुमानाची भक्ती करायची असेल तर त्यांनी फडणवीस यांच्या घरात अमृता वहिनी समोर किंवा मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरात जाऊन हनुमान चालीसा म्हणावी. नवनीत राणा यांच्यावर अत्याचार झाला नाही त्यांनी केलेल्या बेताल कामाची कायद्याने त्यांना शिक्षा मिळालेली आहे. असं देखील रुपाली ठोंबरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातील भोर हादरलं! जावयाच्या हॉटेलमधील आचाऱ्यानंच केला वृद्धाचा खून, धक्कादायक कारण उघड

Petrol Diesel Rate: राज्यात खासगी पंपांवर पेट्रोल-डिझेल महागलं; आता प्रति लिटर 'इतके' रुपये मोजावे लागणार

Vastu Tips For Job: प्रमोशन आणि पगारात वाढ होत नाही? मग 'या' 5 टिप्स फॉलो करा

Political News : भररस्त्यात दिवसाढवळ्या काँग्रेस नेत्यावर प्राणघातक हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: बदलापुरातील 100 टक्के क्षयरोग रूग्णांना घेतलं दत्तक

SCROLL FOR NEXT