Sakshi Sunil Jadhav
थंडीत सगळ्यांनाच सर्दी-खोकला, घशात खवखव आणि जिभेची चव जाण्याचा त्रास होतो. अशा वेळी गरमागरम टोमॅटो सूप तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. जाणून घ्या याची सविस्तर रेसिपी.
सर्दी-खोकल्यामुळे तोंडाची चव गेली असल्यास टोमॅटो सूप चव परत मिळवण्यास फायदेशीर ठरते.
टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात.
फक्त 15 ते 20 मिनिटांत हे सूप तयार होतं. यासाठी फारसं साहित्य लागत नाही, त्यामुळे आजारी असतानाही सहज बनवता येते.
आजारी असताना जड अन्न टाळावं लागतं. टोमॅटो सूप हलकं असल्याने पचायला जड जात नाही आणि पोटाला आराम मिळतो.
गरमागरम सूप प्यायल्याने खवखवणाऱ्या घशाला त्वरित आराम मिळतो आणि सर्दीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
टोमॅटो सूप शरीराला आवश्यक ऊर्जा देते आणि अशक्तपणा दूर करण्यास मदत होते.
सूपमध्ये आलं, लसूण आणि मिरी पूड घातल्यास त्याची चव वाढतेच, शिवाय ते औषधी गुणधर्मांनी जास्त प्रभावी ठरतं.
सर्व्ह करताना वरून थोडं फ्रेश क्रीम किंवा बटर घाला. त्याने सूपला हॉटेलसारखी खास चव येते.