Satyajeet Tambe Saam TV
महाराष्ट्र

Satyajeet Tambe: नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट; सत्यजित तांबेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

सत्यजित तांबे यांनी अपक्ष महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्वीस्ट समोर आला आहे. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म मिळूनही अर्ज भरला नाही. आता सत्यजित तांबे यांनी अपक्ष महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.

काँग्रेसमध्ये सध्या सुरु असलेल्या या घडामोडी बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का मानला जात आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तांबे यांनी काँग्रेसला आणि थोरात यांना कोंडीत पकडल्याचं बोललं जात आहे.

तांबे कुटुंबियांची मोठ्या हुशारीने शेवटच्या क्षणी ही खेळी केली. डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नसल्याने निवडणुकीत काँग्रेस उमेदवार नाही. त्यामुळे सत्यजित तांबे पाठिंबा देण्याशिवाय काँग्रेसला पर्याय देखील नाही.

काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्या नावे एबी फॉम आला होता. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. मात्र सर्वपक्षीय नेत्यांना भेटणार आहे. भाजप, शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचे सत्याजित तांबे यांनी सांगितले.

नाशिक पदवीधर विधानपरिषदेत आतापर्यंत काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे. पण या वेळी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार या निवडणुकीत नाही. विशेष म्हणजे भाजपने इथे आपला उमेदवार दिला नाही.

सत्यजित तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक विधान केलं होतं. सत्यजीत तांबेंना संधी द्या, अन्यथा आमचाही त्यांच्यावर डोळा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. या विधानाचा आणि आज सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीचा संबंध आहे का? हा प्रश्न निर्माण होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT