Political News  Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News : धवलसिंह मोहिते पाटील अजित पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना वेग

Maharashtra Political News : सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाला डबल धक्का बसल्यानंतर अकलूजचे धवलसिंह मोहिते पाटील यांनी पुण्यात अजित पवार यांची भेट घेतली . त्यांच्या या भेटीमुळे राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.

Alisha Khedekar

अकलूजचे धवलसिंह मोहिते पाटीलांनी घेतली अजित पवारांची भेट

भेटीमुळे राजकीय हालचालींना वेग

भाजपच्या ‘ऑपरेशन घड्याळ’नंतर राष्ट्रवादीत अंतर्गत अस्वस्थता

धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील का? याकडे सर्वांचे लक्ष

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाला डबल धक्का मिळाल्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील यांचे चुलत भाऊ धवल सिंह मोहिते पाटील यांनी अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. आज अजित पवार हे पुणे दौऱ्यावर असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील हालचालींना वेग येणार आहे. धवल सिंह मोहिते पाटील यांच्या भेटीने राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

सोलापूरमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने तसेच माजी आमदार बबन शिंदे यांच्या दोन्ही सुपुत्रांनी भाजप प्रवेश केल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला. भाजपने 'ऑपरेशन घड्याळ' राबवून माजी आमदारांना गळाला लावून अजित पवार यांना जोरदार दणका दिला.

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे काही आमदार बॅकफूटला गेल्याचे चित्र निर्माण झाले असताना, अकलूजचे धवलसिंह मोहिते पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

धवलसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चुलत भाऊ आहेत. धवलसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष होते. विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. मध्यंतरी काहीसे शांत झालेले धवलसिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांची भेट घेतल्याने भविष्यकाळातली राजकीय संधी पाहून ते आपल्या मनगटावर घड्याळ बांधणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT