Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Latest Update SAAM TV
महाराष्ट्र

CM Eknath Shinde : उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय; CM एकनाथ शिंदेंचा घणाघात

Political News : दिल्ली केंद्रातील मोदींचं काम पाहून उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली.

Ruchika Jadhav

उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर अधिक काय बोलणार, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी केलेल्या टीकेवर खासदार संजय राऊतांनी देखील सडेतोड उत्तर दिलं आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकांचा गाजावाजा सुरू आहे. लोकशाहीचा मोठा उत्सव म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सातत्याने आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात आता शाब्दिक युद्ध सुरू असल्याचं दिसतंय. अशात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केलीये.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. आम्ही जे काम करत आहोत त्यासाठी लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत. राज्यात विविध विकासकामे सुरू आहेत. महायुतीचं सरकार पुन्हा येणार असा माहोल दिसत आहे. दिल्ली केंद्रातील मोदींचं काम पाहून उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली.

विरोधक म्हणतात मराठा आरक्षण टिकणार नाही. मी म्हणालो कसे टिकणार नाही? याची कारणे द्या. मी तर छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेत शपथ घेतली होती आरक्षण देणार आणि दिले आहे. मुस्लिम समाजामध्ये हे लोक घबराट पसरवत आहेत, मुस्लिम समाज पण आमच्याबरोबर आहे. माझ्या कारवर माझा साथी म्हणून मुस्लिम व्यक्ती आहे. आमच्याकडे भेदभाव नाही, असंही एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं.

केंद्र सरकारच्या योजनेत सर्व जातीचे लोक आहेत, आम्ही भेदभाव करत नाहीत. पण सध्या जनतेला घाबरवणे सुरू आहे, भीती घालने सुरू आहे. निवडणूकीमध्ये घाबरवून मत आपल्या पारड्यात टाकायचे आणि नंतर सोडून द्यायचे, अशी कामे सुरू असल्याचा आरोप शिंदेंनी विरोधकांवर केला आहे.

काय म्हणाले संयय राऊत?

या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, कोण एकनाथ शिंदे? उद्याची निवडणूक झाली की एकनाथ शिंदे यांचं महाराष्ट्रातील अस्तित्व कायमचं संपणार आहे, असा दावा राऊतांनी केला आहे. संतुलन कोणाचं बिघडलं? आणि कुणाचं काय झालं? हे ४ जूननंतर स्पष्ट होईल, असं प्रत्युत्तर देत राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT