Saam Tv
साबणामुळे त्वचा रफ आणि कोरडी होते. योग्य फेस वॉश त्वचेच्या समस्या दूर करते. चेहऱ्याला दिवसभर फ्रेश ठेवते. फेस वॉश लावल्याने चेहऱ्यावर ग्लो टिकून राहतो.
चेहऱ्यासाठी योग्य फेस वॉश निवडण्याआधी आपली स्किन कोणत्या टाईपची आहे हे ओळखणे महत्त्वाचे असते.
तुमची स्किन ऑयली असेल तर असा फेस वॉश निवडा ज्यामुळे चेहऱ्यावरचे एक्सट्रा ऑयल निघून जाण्यास मदत होईल. जेल टाईप फेस वॉश ऑयली त्वचेसाठी उत्तम असते.
ड्राय स्किनसाठी मॉश्चराईजिंग, हायड्रेशन, क्रिमी, सौम्य फेसवॉश फायद्याचा असतो. किंवा असा फेस वॉश ज्यात हायलुरोनिक अॅसिड, ग्लिसरीन, अॅलोवेरा किंवा शिया बटर असतील असा फेस वॉश निवडावा.
सेंसिटिव्ह त्वचेसाठी स्ट्राँग केमिकल्स नसलेले, सुगंध नसलेले, माइल्ड फेसवॉश योग्य ठरते. चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने जोरात न रगडता सुती, मऊ कापडाने पुसून घ्यावा.
या त्वचेसाठी असा फेस वॉश निवडावा जो अतिरिक्त तेल काढेल पण त्वचा जास्त कोरडीही होऊ देणार नाही. या प्रकारासाठी सौम्य जेल बेस्ड किंवा माइल्ड फोमिंग फेस वॉश, ज्यामध्ये हायलुरोनिक अॅसिड इ. घटक असतील.
नॉर्मल स्किनसाठी त्वचा निरोगी ठेवता येणारे फेस वॉश महत्त्वाचे असते. अशा स्किनसाठी नैसर्गिक घटकांचा वापर उत्तम मानला जातो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.