Political News : भाजपच्या कार्यकारणीमध्ये मोठे फेरबदल होणार अशी चर्चा कालपासून सुरु होती. अशात आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: याविषयी माहिती दिली आहे. कार्यकारणीमध्ये बदल होण्यामागचं कारण देखील यावेळी त्यांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)
चंद्रशेखर बावनकुळेंनी यात म्हटलं आहे की, " कार्यकारणीमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. प्रत्येक तीन वर्षांनी फेरबदल होत असतात. साडेतीन वर्षांचा कार्यकाळ झाला आहे. मी पदग्रहन केल्यानंतर नवीन कार्यकारणी अपेक्षित होते. त्यामुळे उद्या दुपारी एक वाजता प्रदेश भाजप कार्यालयामध्ये नवीन भाजप प्रदेश कारकाची घोषणा होणार आहे. "
समन्वयकांची यादी सुद्धा लवकरच जाहीर होईल असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी यावेळी म्हटलं. शदर पवारांच्या पुस्तकावर प्रश्न विचारल्यानंतर पुस्तक मी वाचलेलं नाही त्यामुळे बोलणार नाही. अजित पवारांबद्दल असेल तर त्याचं उत्तर अजित पवार देतील, असं म्हणत त्यांनी बोलणं टाळलं आहे.
काल पार पडलेल्या वज्रमुठ सभेवर बोलताना त्यांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मांडीवर बसल्यानंतर अमित शाह यांच्यावर टीका करतायत. उध्दव ठाकरे यांच्या भाषणाच्या वेळी खुर्चा खाली असतात. त्यांचेच नेते त्यांचं भाषण ऐकत नाहीत.
बाजार समिती निवडणूकमध्ये भाजप पहिल्यांदा सहकार क्षेत्रात उतरले आहे. तरी पहिल्या नंबरवर आहे. काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या जागा आल्यात त्यात नवल असं काय? उध्दव ठाकरे यांची लायकी नाही अमिती शाह यांच्यावर टीका करण्याची, अशी खरमरीत टीका बावनकुळेंनी केली आहे.
संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्या विरुद्ध निवडून दाखवा
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांविषयी बोलताना बावणकुळेंनी म्हटलं की, हे लोक कोर्टात गेले आहेत. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका लांबणीवर जातायत त्याचं करण राष्ट्रवादी काँग्रेसच आहे, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) केलाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.