Maharashtra Assembly Election 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Amravati Assembly Election : अमरावतीमध्ये राजकीय खळबळ, दिल्लीवारी केल्यानंतर दोन आमदारांना पुन्हा तिकीट नाही?

Political News : मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना महायुतीने उमेदवारी नाकारली आहे. तर वरुड मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनाही महायुतीने उमेदवारी नाकारली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांची फरफट होताना दिसत आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मुंबई -दिल्ली वारी करून दोन्ही आमदार थकले आहेत. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना महायुतीने उमेदवारी नाकारली आहे. तर वरुड मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनाही महायुतीने उमेदवारी नाकारली आहे.

त्यामुळे आमदार देवेंद्र भुयार आणि आमदार राजकुमार पटेल यांना अपक्ष उभं राहण्याची वेळ आली आहे. दोन आठवड्यांपूर्वीच राजकुमार पटेल यांनी प्रहार सोडलं होतं आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना सेनेची उमेदवारी मिळेल सांगितले होतं मात्र अद्याप त्यांना उमेदवारी मिळालेली नाही.

त्यामुळे आता राजकुमार पटेल पुन्हा बच्चू कडू यांच्या प्रहारकडून निवडणूक रिंगणात उतरणार अशी चर्चा आगे. तसेच देवेंद्र भुयार यांनाही अद्याप महायुतीने उमेदवारी न दिल्याने देवेंद्र भुयार अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आमदार म्हणून देवेंद्र भुयार यांची ओळख आहे. मात्र भुयार यांना अजित पवारांनी जोरदार झटका दिल्याचं दिसतंय. महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने आमदार देवेंद्र भुयार यांची उमेदवारी कापल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्राचा संकल्प; ३ वर्षांत १४५ उड्डाण पूल-CM फडणवीस

मुख्यमंत्र्यांची मोठी खेळी;10 आमदार देणार AIADMK पक्षाचा राजीनामा; राजकारणात मोठी खळबळ

Mix Bhaji Recipe : पावसाळ्यात घरच्या घरी बनवा कुरकुरीत मिक्स भजी; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

Medha Manjrekar: 'देवाने प्रत्येक टप्प्यावर साथ दिली...'; कॅन्सरचे निदान झाल्यानंतर अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची भावनिक पोस्ट

Maharashtra News Live Update: कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

SCROLL FOR NEXT