Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Satyacha Morcha : आजचा मोर्चा रिकामटेकड्या कार्यकर्त्यांची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'; अजित पवार गटाच्या आमदाराची टीका

Maharashtra Politics : महाविकास आघाडी आणि मनसेच्या सत्याच्या मोर्चावर आमदार अमोल मिटकरींनी जोरदार टीका केली आहे. हा सत्याचा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Alisha Khedekar

अमोल मिटकरींनी मविआ आणि मनसेच्या सत्याच्या मोर्चावर जोरदार टीका केली

“हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा” असं विधान केलं

अजित पवारांच्या वक्तव्यावरून टीका करणाऱ्यांना मेंदू तपासणीचा सल्ला

महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणजे पराभवाची चाहूल असल्याचं मत

मुंबईत आज महाविकास आघाडी आणि मनसेचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रित सत्याचा मोर्चा निघाला. या मोर्चावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे. मिटकरींनी या मोर्चाला हौशा- गौश्या- नवशांची यात्रा म्हटली आहे. या सोबतच हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा असल्याचा चिमटा आमदार अमोल मिटकरींनी काढला आहे. महायुती भक्कमपणे काम करत असल्यानेच महाविकास आघाडी आणि मनसे असे मोर्चे काढत असल्यास मिटकरी म्हणाले.

अमोल मिटकरी यांनी यावेळेस अजित पवारांच्या कर्जमाफीच्या वक्तव्यावरून होत असलेल्या टीकेचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अजितदादा बारामतीमध्ये असताना आपल्या परिवाराशी बोलतात तसे त्या सभेत बोलल्याचं मिटकरी म्हणाले. यावरून काही अक्कल नसलेले लोक 'ट्वीट' करीत आपल्या बुद्धीचं प्रदर्शन करीत असल्याचं ते म्हणाले. यावरून टीका करणाऱ्या विजय वडेट्टीवार आणि रोहित पवार यांनी एकदा आपल्या मेंदूची तपासणी करावी, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

अजित पवारांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणारे महामूर्ख आहेत. त्यांनी मुंबईतील रुग्णालयात जात आपल्या मेंदूची तपासणी करावी, असा सल्ला मिटकरींनी दिला. दरम्यान, दादांचं बारामती होमग्राउंड आहे, तिथल्या शेतकऱ्यांसोबत घरोबाच नातं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आत्मविश्वासाने ते बोलले. मात्र, त्यांचं व्यक्तव्य कसं चुकीचं आहे. हे दाखवण्यासाठी काहींचा प्रयत्न असतो. तेच त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केलेली चमकोगिरी पाहायला मिळाली, असेही मिटकरी बोलले.

पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, राष्ट्रवादी ही शरद पवारांची आहे असं म्हणणाऱ्या चंद्रकांत दादांची 'स्लीप ऑफ टंग' झाली असावी. मात्र, ते महाविकास आघाडीचे आहेत की महायुतीचे आहेत? हे समजत नाही. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची याचा कौल दिला आहे. वाढत्या वयामुळे चंद्रकांत दादांकडून अशी वक्तव्य होत असल्याचं त्यांनी म्हटलं.

पुढं बोलताना म्हटले की चंद्रकांत पाटील हे भावनेतून भलतंच काही बोलून जातात, नंतर त्यांना त्यांची चूक कळते. कदाचित त्यांच्या मनात तस काही नसणारही. परंतु कदाचित वाढत्या वयामुळे विसरभोळेपणाचा आजार चंद्रकांत दादांना जडला असावा. म्हणून त्याच संभ्रमातून केलेलं त्यांचं हे व्यक्तव्य असल्याचेही मिटकरी म्हटले. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर खरी शिवसेना, राष्ट्रवादी कुणाची हे जनतेने दाखवून दिले. हेही चंद्रकांत दादांनी लक्षात ठेवावं, अशी विनंती मिटकरींनी केली आहे.

मतचोरीविरोधात मनसे आणि महाविकास आघाडीचा एल्गार पाहायला मिळाला. पण याच सत्याच्या मोर्चावर देखील आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली. दरम्यान, मविआचा आज निघालेला मोर्चा हा महाराष्ट्राला मनोरंजन देणारा आणि हौशा- गौश्या- नवशांची हास्य जत्रा असल्याची टिका केली आहे. भविष्यातला पराभव पाहता हा मोर्चा होता, या हास्य मोर्चाचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही. मात्र महाराष्ट्राला मनोरंजन देणारा आजचा हा मोर्चा निघाला असल्याचं मिटकरी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! दोन जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

सोनं आजच खरेदी करा; २,६२० रूपयांनी स्वस्त, चांदीच्या दरातही कमालीची घट, जाणून घ्या लेटेस्ट दर

Blocked Arteries Symptoms: हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यावर दिसतात 'ही' लक्षण, दुर्लक्ष केल्याने वाढेल हार्ट अटॅकचा धोका

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा अपघात, २ जणांचा मृत्यू

IND W vs SA W Final World Cup 2025: नवी मुंबईत पाऊस धुमाकूळ घालणार, फायनल रद्द झाली तर विश्वचषकाची ट्रॉफी कुणाला? वाचा

SCROLL FOR NEXT