Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : घराणेशाहीला ब्रेक! अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात, भाजपाचा धडाकेबाज निर्णय

Ahilyanagar News : श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने घराणेशाहीला ब्रेक लावून विधवा ओबीसी महिला उमेदवार निवडून राजकीय समीकरणात मोठा बदल घडवला आहे. २२ पैकी १४ महिला उमेदवार रिंगणात असून या निर्णयामुळे निवडणूक अधिक रंगणार आहे.

Alisha Khedekar

  • श्रीगोंद्यात भाजपाचा घराणेशाहीला ब्रेक

  • नगराध्यक्षपदासाठी विधवा ओबीसी महिलेला संधी

  • २२ पैकी १४ महिला उमेदवार रिंगणात

  • या निर्णयामुळे निवडणूक अधिक रंगतदार बनली आहे

सुशील थोरात, अहिल्यानगर प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगर परिषदेत यंदाची निवडणूक चूरशीची ठरणार असून या लढतीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र या तालुक्यात भाजपाच्या एका निर्णयाने तालुक्याचे समीकरण फिरले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खरंतर जिल्हा नाही तर राज्यातील अनेक नगर परिषदांमध्ये नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना, कुटूंबातील लोकांना नगराध्यक्षा पदासाठी उमेदवारी दिल्याचे चित्र असताना श्रीगोंद्यात याला वेगळे वळण मिळाले आहे.

भाजपाचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या भावाची बायको इंद्रायणी पाचपुते इच्छुक असतानाही त्यांना उमेदवारी न देता पक्षाने एका विधवा ओबीसी महिलेला नगराध्यक्षा पदाची उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. एवढं नव्हे तर नगरसेवक पदाच्या २२ जागेसाठी १४ महिला उमेदवार देत नारी शक्तीच्या हातात सत्ता देण्याचा आमचा योगदान राहील अशी ठाम भूमिका घेतली आहे.

तसेच आयत्या उमेदवारांना संधी न देण्याचा ठाम निर्णय भाजपाने घेऊन, भाजपाच्या कार्यकर्त्या असलेल्या सुनीता खेतमाळीस यांच्या सह १४ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनेक ठिकानी नेते आपल्या कुटुंबातील लोकांना संधी देताना पाहायला मिळतात मात्र श्रीगोंदा तालुक्यात भाजपाने घेतलेल्या निर्णयाने राजकीय गणिते फिरले असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे भाजपाने दिलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबद्दल प्रतिक्रिया देताना सुनीता खेतमाळीस यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "माझ्या पतीचे सामाजिक कार्य आणि पक्षाशी असलेली त्यांची निष्ठा पाहून मला संधी देण्यात आली आहे. हे आमच्यासाठी अभिमानाचे क्षण आहेत. त्यामुळे नक्कीच यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे." श्रीगोंद्यातील या निर्णयामुळे राजकीय समीकरणांना नवीन कलाटणी मिळाली असून नगर परिषद निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: TET पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळी जेरबंद

मोठी बातमी! नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांनी केली अटक, नेमकं प्रकरण काय ?

Anant Garje: अनैतिक संबंध, मोबाइलवर चॅटिंग; समजूत काढूनही तीच चूक; बायकोच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेंवर गंभीर आरोप

Vande Bharat Express : नागपूर वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

khajur Benefit: हिवाळ्यात रोज ३ खजूर खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT