"Shinde faction leaders stunned as alleged mass joining turns out to be fake – political shocker in Ahilyanagar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिक्षक, नोकरभरतीनंतर आता पक्षप्रवेश घोटाळा?

Fake Political Induction Scandal: तुम्ही आतापर्यंत शिक्षक भरती घोटाळा ऐकला असेल. नोकर भरती घोटाळा ऐकला असेल. घरकुल घोटाळा ऐकला असेल. पण आता घोटाळा झालाय तो चक्क पक्ष प्रवेशामध्येच. नेमका हा पक्षप्रवेश घोटाळा आहे तरी काय?

Omkar Sonawane

राजकारणाचा एक नियम चावडीवर लिहलाय... एकीकडं बघायचं दुसरीकडं नेम धरायचा अन् तिसरा घायाळ... पण जर नेम चुकला तर तुमचा करेक्ट कार्यक्रम झाला म्हणून समजा... अन् तसा कार्यक्रम झालाय शिंदे गटाचा... ती पण आहिल्यानगरमधी... एकमद मोये मोये स्टाईल

त्याचं झालं असं राजकारणाच्या फिरलेल्या वाऱ्यात आपण बी आपली पतंग उडवुया असं मानात ठेवून अनेक नेत्यांनी निरनिराळ्या पक्षात प्रवेश करायचा धडाकाच लावलाय. त्यात मारुती मेंगाळ यांनी ठरवला शिंदे गट...

अन् दणक्यात शिंदेंच्या उपस्थितीत केला प्रवेश... आपल्यासंग सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य काय अन् नगरसेवक काय सगळी सोबत असल्याचा दावा केला. अन् जाहीर केली यादी... पण ज्यांची नावं यादीत त्यांनीच दिला धोका अन् राजकारणात साधला मोका

बघितलं का कसा असतू करेक्ट कार्यक्रम... आहो मंडळी, मेंगाळ कारभाऱ्याचा एक दोघांनी नाय तर 40 जणांनी केलाय गेम. जागेवर भिंगरी... एकाच दणक्यात लॉटमधी पक्ष प्रवेश होणार म्हणून हारकून गेलेल्या शिंदे गटाचा झाला हिरमोड.... शिंदे गटाच्या मंत्र्यावर घोटाळ्याचं आरोप तर होत्यात आता आता पक्षात पक्षप्रवेश घोटाळा झाल्याचं कळाल्यावर शिंदे गटानं लावलाय डोक्याला हात...

राजकारणात ज्याला मांजराचा वाघ अन् वाघाचं मांजर करता येतू ती सरस नाय तर शिकार झाली म्हणून समजा तशीच शिकार झाली शिंदे गटाची

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT