रायगड : पती, मुलांना जीवे मारण्याची धमकी देत पोलिसाचा महिलेवर वारंवार बलात्कार राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

रायगड : पती, मुलांना जीवे मारण्याची धमकी देत पोलिसाचा महिलेवर वारंवार बलात्कार

पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तो गेली सहा वर्ष महिलेशी शारीरिक संबंध ठेवत होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : अलिबाग (Alibaug) येथे जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलिसाने विवाहित महिलेवर बलात्कार (Sexual Assault) केल्याचे प्रकरण समोर आले असून पेण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शाम जाधव असे पोलीस हवालदाराचे नाव आहे. पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तो गेली सहा वर्ष महिलेशी शारीरिक संबंध ठेवत होता.

शाम जाधव यांच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून न्यायालयात हजर केले असता चार जानेवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित महिला पेण पोलीस ठाण्यात जाधव विरोधात तक्रार करीत असता त्यांनी पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ करून मारहाणही केली आहे. याबाबतही जाधव यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या बाबत गुन्हा दाखल केला आहे.

अलिबाग येथील जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस हवालदार शाम जाधव (रा.शिवाजी नगर ,रामवाडी ,पेण) याने पोलीस असल्याचा फायदा घेत पेण शहरातील एका विवाहित महिलेला तिच्या पतीला व मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन 2015 पासून आज पर्यंत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. याबाबत तक्रार पीडित महिलेने पेण पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री दाखल केली आहे. त्यानुसार पेण पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस शाम जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शाम जाधव याला पेण पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास चार जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे देखील पहा-

आरोपी पोलीसाची सहकाऱ्यांनाच दमबाजी आणि मारहाण

आरोपी शाम जाधव याच्या विरोधात सदर महिला पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेली असता या महिलेची फिर्याद ऐकून घेत असताना आरोपी शाम जाधव याने पेण पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस नाईक व महिला पोलीस उप निरीक्षक घाडगे यांना शिवीगाळ केली.

यावेळी ड्युटीवर असलेले पोलीस नाईक गुजराथी व पोलीस शिपाई मढवी हे समजावण्यासाठी गेले असता त्यांना देखील शिवीगाळ करुन हाताबुक्क्याने मारहाण केली. तसेच शाम जाधव याला तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी आलेले पोलीस शिपाई जाधव याना शिवीगाळ करुन लाथेने मारहाण केली व गुजराथी यांच्या कानाखाली मारली. या याप्रकरणी देखील आरोपी शाम जाधव याच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT