Ganja Seized in jalna saam tv
महाराष्ट्र

गांजा तस्करांचा सुळसुळाट, पोलिसांच्या धाडीत ६३ किलो गांजा जप्त, तीन आरोपी ताब्यात

जालना शहरात गांजा तस्करांनी धुमाकूळ घातल्याने खळबळ उडाली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : शहरात गांजा तस्करांनी धुमाकूळ घातल्याने खळबळ उडाली आहे. छुप्या मार्गाने जालना शहरात गांजा विक्रीचा (Ganja selling) धक्कादायक प्रकार सुरु असल्याची खबर पोलिसांनी मिळाली. तस्कर एका कारमधून ६३ किलो गांजा जालना शहरात विक्रीसाठी घेवून येत होते. परंतु, रोहनवाडी पुलाजवळ पोलिसांनी सापळा रचला.

त्यावेळी पुलाच्या दिशेने रस्त्यावरून येणारी कार पोलिसांनी थांबवली. या कारची झाडाझडती घेतली असता पोलिसांना ५ बॅग आढळल्या. या बॅगेत ६३ किलो गांजा असल्याने पोलिसांनी (Police) एकूण १२ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून गांजा विक्रीसाठी वापरण्यात येणारी कारही जप्त केली आहे. (Police seized 63 Kg ganja in jalna city)

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरात गांजा विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तस्कर एका कारमधून ६३ किलो गांजा जालना शहरात विक्रीसाठी घेवून येत होते. परंतु, पोलिसांनी वेळीच सापळा रचून गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत ६३ किलो गांजा जप्त केला असून तीन तस्करांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT