Accident News, satara,  saam tv
महाराष्ट्र

Khambatki Ghat Accident : 'खंबाटकी' नजीक कॅनाॅलमध्ये कार काेसळली, धाडसी पाेलिसांसह ग्रामस्थांनी वाचविले चाैघांचे प्राण

Pune Bangalore National Highway: सलग सुट्यांमुळे पुणे-मुंबईकरांनी महाबळेश्वरची वाट धरली आहे.

ओंकार कदम

Satara Breaking News : सलग सुट्यांमुळे पुणे-बंगळुरू महामार्गावर आज (शनिवार) साता-याच्या दिशेने पुण्याहून येणा-या वाहनांची माेठ्या प्रमाणात संख्या आहे. यामुळे या महामार्गावर अधून मधून वाहनधारकांना वाहतुक काेंडीस समाेरे जावे लागत आहे. याच महामार्गावर एक चार चाकी कॅनाॅलमध्ये पडली. या घटनेनंतर नागरिकांनी वाहनातील सर्वांचा जीव वाचविला. (Maharashtra News)

प्राथमिक माहितीनूसार खंबाटकी घाटा जवळ ही घटना घडली. येथे असणाऱ्या कॅनॉल मध्ये एक चार चाकी वाहन कोसळले. या वाहनात चार प्रवासी हाेते. कॅनॉल मध्ये पडलेले वाहन वाहून जाताना पोलिसांनी आणि नागरिकांनी सतर्कता दाखवल्याने पुढील दुर्घटना टळली.

या घटनेनंतर चौघांचा जीव वाचविण्यात नागरिकांना यश आले. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. ग्रामस्थांच्या धाडसामुळे या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळी अन् छठपूजेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात 'या' ठिकाणांहून सुटणार १७०२ विशेष गाड्या

Firecracker Safety Guide: फटाके फोडताना काळजी घ्या! डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग

Viral Fever: दिवाळीनंतर वायरल तापाचा धोका वाढतो? जाणून घ्या कारण

Raigad Crime: सोशल मीडियावरच्या प्रेमासाठी तोडली सात वचनं; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने काढला पतीचा काटा

SCROLL FOR NEXT