Crime News Updates Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: एकतर्फी प्रेम; दाेन कुटुंबात झाला राडा, ७ जणांवर गुन्हा दाखल

या घटनेतील तिघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

अभिजीत घोरमारे

गोंदिया : गोंदियात (gondia) एकतर्फी प्रेमातून एक थरारक घटना घडली असून १७ वर्षीय मुलगा १२ वर्षीय मुलीच्या प्रेमात (love) वेडा झाला. परंतु ती बोलत नसल्याने त्याचा राग अनावर झाला व त्याने थेट तिचे घर (home) गाठत तिला तिच्या कुटुंबियांसमोर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर गटात वादावादी व मारामारी झाली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. (gondia latest marathi news)

संबंधित मुलीच्या आईने मुलाने घरी येऊन धमकी दिल्याची माहिती नातेवाईकांना सांगितली. तसेच मदत मागितली. त्यानंतर मुलाने दोन नातेवाईकांवर चाकूने हल्ला करून त्यांना जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या गटातील एकावर चाकूने हल्ला केला. या घटनेतील तिघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तसेच दोन जण गंभीर असल्याने त्यांना नागपूरला (nagpur) नेण्यात आले आहे. या प्रकरणात दोन्ही गटांतील सात जणांवर गोंदिया शहर पोलिसात (gondia city police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक श्री. नाळे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8वा वेतन आयोगाचा निर्णय शेवटच्या टप्प्यात; लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Crime: शौचाला गेले असता अपहरण, शेतात नेऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आरोपींनी व्हिडीओ काढले अन् धमकावले

Fruits on empty stomach: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोणती फळं खाऊ नयेत?

Maharashtra Live News Update : नंदुरबारमध्ये १७.६१ लाखांचा अवैध गुटखा जप्त; शहादा पोलिसांची मोठी कारवाई

ठरलं! सुनेत्रा पवारांच्या विरोधात हा बलाढ्य नेता उभा राहणार; उद्याचा अर्ज भरणार|VIDEO

SCROLL FOR NEXT