Amravati Spa 99 Centre Saam Tv
महाराष्ट्र

Amravati Spa 99 Centre :स्पा सेंटरच्या नावाखाली नको 'त्या' गोष्टींची मागणी ; पोलिसांनी केला पर्दाफाश

Amravati News : अमरावतीतील नेक्स्ट लेव्हल मॉलमधील स्पा ९९ वर पोलिसांनी धाड टाकून मसाजच्या नावाखाली सुरु असलेला देहविक्रीचा धंदा उघडकीस आणला. या कारवाईत मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, स्पा मालकाला अटक केली आहे.

Alisha Khedekar

अमरावतीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती गुन्हेशाखेने स्पा सेंटरवर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. कॅम्प मार्गावरील नेक्स्ट लेवल मॉलमध्ये असलेल्या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला आहे. याप्रकरणी स्पा सेंटरच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी पिंपरी येथून बावधन पोलिसांनी दिव्य शक्तीची आत्मभूती असल्याचे सांगत अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अश्लील वर्तन करून खाजगी चित्रीकरण करणाऱ्या प्रसाद तामदार या भोंदू बाबाला अटक केली. त्यानंतर आता अमरावतीत स्पा सेंटरच्या नावाखाली नको त्या गोष्टी घडताना पोलिसांना आढळल्या. अमरावती शहराच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात येणाऱ्या कॅम्प मार्गावरील नेक्स्ट लेवल मॉलमध्ये पहिल्या मजल्यावर स्पा ९९ नावाचे मसाज सेंटर आहे. या सेंटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मसाज थेरेपीच्या नावावर चक्क देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता.

या व्यवसायाचा पोलिसांनी छापा टाकत भांड फोडलं आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने स्पा ९९ या सेंटरवर धाड टाकत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून आक्षेपार्ह वस्तू,मोबाईल,रोख असा एकूण १ लाख १४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिघांविरुद्ध गाडगेनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अमरावतीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मसाज सेंटरच्या नावाखाली आजकाल बऱ्याच चुकीच्या घटना घडत आहेत. ग्राहकांना सेवा देण्याच्या बहाण्याने भलत्याच गोष्टी पुरवल्या जातात. या प्रकरणात ग्रहकांची फसवणूक केली जाते. या फसवणुकीत महिला आणि तरुणींची संख्या जास्त आहे. दरम्यान अशाप्रकारच्या छुप्या धंद्यांची माहिती पोलिसांना कळवून सुसंस्कृत आणि सुरक्षित समाजाच्या निर्मितीसाठी हातभार लावावा असे प्रशासनातर्फे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT