police  Saam Digital
महाराष्ट्र

Chandrapur Police ends life : राज्यात २४ तासांत दोन पोलिसांनी संपवलं जीवन; कर्मचारी वर्तुळात एकच खळबळ

Chandrapur Police ends life Latest News : राज्यात २४ तासांत दोन पोलिसांनी जीवन संपवलं आहे. दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येमुळे कर्मचारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : रायगड पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं. रायगडची घटना ताजी असताना चंद्रपुरातही एका पोलीस शिपायाने जीवन संपवलं आहे. राज्यात २४ तासांत दोन पोलिसांनी आत्महत्या केल्याने कर्मचारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपुरातील पोलीस शिपायाने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस वसाहतीत एका कर्मचाऱ्याने जीवन संपवलं आहे. मृत पोलिसाचे नाव अजय मोहूर्ले आहेत. बल्लारपूर पोलीस स्थानकात शिपाई पदावर कार्यरत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या मृत पोलीस शिपायाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

अजय मोहूर्ले याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज बल्लारपूर पोलिसांनी व्यक्त केला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट आहे. दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातच एका पोलीस शिपायाने तणाव न सहन झाल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ही दिसरी घटना चंद्रपुरात घडली आहे. त्यानंतर जिल्ह्यात ही दुसरी घटना घडल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

रायगडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

रायगड पोलीस दलातील कर्मचाऱ्याने सोमवारी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राहुल कडू असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो रायगड जिल्हा पोलिस मुख्यालय येथे कार्यरत होता. सुधागड तालुक्यातील घोटवडे या आपल्या गावी आपल्या रहात्या घरी त्याने जीवन संपवलं. राहुल याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेने सर्वांना धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT