posco  SaamTV
महाराष्ट्र

Posco Act: बालिकेच्या विनयभंग प्रकरणी पोलीस पाटलास अटक

पोलिसांचा मदतगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस पाटलानेच विनयभंग केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा : साकोली तालुक्यातील एका पोलीस पाटलाने एका १३ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संजय रामकृष्ण रामटेके (वय ३५) असे या पोलीस पाटलाचे नाव आहे. या घटनेची तक्रार (bhandara) साकोली (sakoli) पोलीस (police) ठाण्यात करण्यात आली असून संबंधित पोलिस पाटला विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (bhandara latest marathi news)

साकोली तालुक्यातील एका गावात रात्री बचत गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी दरम्यान एका बालिकेस पोलीस पाटलाकडून स्टॅम्प आणण्यासाठी पाठविले होते. ती एकटीच आल्याचे पाहून पोलीस पाटलाने संबंधित बालिकेचा विनयभंग केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी बालिकेने सर्व घडलेला प्रकार आपल्या घरात सांगितला. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी साकोली पोलीस ठाणे गाठत पाेलिस पाटील याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. साकोली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संजय रामटेके याच्यावर पाेक्साे (posco) अंतर्गत गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT