चेतन व्यास
Wardha News : नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी पोलीस सदैव तत्पर असतात. मात्र जेव्हा पोलीस अधिकारीच हैवान होतो तेव्हा दाद मागवी तरी कुणाकडे असा प्रश्न पडतो. अशीच एक धक्कादायक घटना वर्ध्यातील हिंगणघाट शहरात समोर आली आहे.
तक्रार देण्यास गेलेल्या २४ वर्षीय पीडितेची तक्रार न घेता तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करुन वारंवार तिचे लैंगिक शोषण पोलीस अधिकाऱ्यांने केलं आहे. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसातील तत्कालीन पोलिस निरीक्षक संपत चव्हाण याच्याविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या वडिलांविरोधात ५ ऑगस्ट २०२१ रोजी हिंगणघाट पोलिसात तक्रार देण्यास गेली होती. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस निरीक्षक संपत चव्हाण याने तुझी मदत करतो, पण तु माझ्याशी मैत्री कर, असं म्हटलं. पीडितेने नकार दिला असता चव्हाण याने तुझी तक्रार मी घेणार नाही असे सांगितले. (Crime News)
पीडितेने मी वरिष्ठांकडे तक्रार करेल, असं म्हणत पोलिस ठाण्यातून निघाली. मात्र, १९ ऑगस्ट २०२१ रोजी संपत चव्हाण रात्री ९ वाजता पीडितेच्या घरी गेला आणि धमकी दिते एफआयर नोंदवतो असं सांगितलं. बरेच दिवस उलटल्यानंतरही तक्रार न घेतल्याने पीडितेने पुन्हा चव्हाण याला तक्रार घेण्यासाठी सांगितले. मात्र चव्हाण याने पीडितेला चक्क एफआयआर करायची असेल तर माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित कर, असं म्हणत बळजबरीने पीडितेवर अत्याचार केला.
याचा व्हिडीओ बनवून त्यांनी पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. चव्हाण याने ब्लॅकमेल करत वारंवार एप्रिल २०२२ पर्यंत पीडितेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपी पीडितेने तक्रारीत केला आहे. अखेर पोलिस निरीक्षक संपत चव्हाण याच्याविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरुन अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत.
पीडितेने ६ मे २०२२ रोजी पुन्हा पोलीस ठाण्यात जात विनंती केली असता पोलिस निरीक्षक चव्हाण याने वडिलांवर खोटी कारवाई करण्याची धमकी दिली. त्यानंतर ठाणेदार चव्हाण रजेवर गेला. रजेवरुन आल्यानंतरही २७ डिसेंबर २०२२ रोजी पुन्हा संपत चव्हाण याने ब्लॅकमेल करत पीडितेचे लैंगिक शोषण केले. यानंतर पीडितेने तक्रारीवरुन पोलीस निरीक्षक चव्हाणवर हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.