सहाय्यक पोलीस निरीक्षक अडकला लाचलुचपत जाळ्यात विजय पाटील
महाराष्ट्र

सहाय्यक पोलीस निरीक्षक अडकला लाचलुचपत जाळ्यात

सांगलीच्या मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान बिले यांना २५ हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीच्या मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान बिले यांना २५ हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई सांयकाळच्या सुमारास झाली आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचा पदभार काही काळ बिले यांच्याकडे होता. त्याकाळात त्यांच्याकडे पोक्सो कायद्यातंर्गत एकावर गुन्हा दाखल होणार होता.

या गुन्ह्यातून संशयिताला वाचविण्यासाठी त्यांनी त्याच्याकडून २५ हजाराची लाच मागितली होती. ही लाच स्विकारताना बिले याना अटक करण्यात आली आहे. यामुळे सांगली पोलीस दलात एकच मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी की, समाधान बिले यांच्याकडे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचा पदभार काही काळ होता. या कालावधी मध्ये त्यांच्याकडे एक पोक्सोतर्गत तक्रार दाखल होणार होती.

हे देखील पहा-

या तक्रारीमध्ये एका संशयिताचे नाव गुन्ह्यात होते. त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करायची नाही. यासाठी बिले यांनी या संशयितांकडे २५ हजाराची लाच मागितली होती. ही लाच देण्याची कबुली दिली. तरच त्याचे नाव गुयात घेण्यात येणार नाही, असे आश्वासन दिले होते. दरम्यान याबाबत या संशयितांने लाचलुचपत विभागाकडे बिले याच्याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीची लाचलुचपत विभागाकडून शहानिशा करण्यात आली.

त्यानंतर आज याबाबत सापळा रचण्यात आला. मिरजेच्या मध्यवर्ती असणाऱ्या हिरा हॉटेल चौकात समाधान बिले यांना बोलविण्यात आले होते. याठिकाणी सापळा लावण्यात आला होता. बिले हे सांगितल्यानुसार आले आणि त्यांनी संशयिताकडून २५ हजाराची लाच स्विकारली. तात्काळ लाचलुचपत विभागाने त्यांना पकडले आणि त्यांना अटक केली आहे. बिले यांच्याकाळात अनेक प्रकरणे चर्चेत आली होती. त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल होते. यामधील या तक्रारीत मात्र ते अलगदपणे अडकले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर

भेसळयुक्त दुधानंतर आता FDAच्या निशाण्यावर मिसब्रँडेड सौंदर्यप्रसाधने; 34.61 लाखांचा साठा जप्त

पंढरपुरात भीषण अपघात; भरधाव टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू

ठाकरेंच्या खासदाराच्या कारचा अपघात; ताफ्यातल्या गाड्या एकमेकांवर आदळल्या|VIDEO

Gold Rate : दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होणार; तज्ज्ञांचा मोठा इशारा

SCROLL FOR NEXT