राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाच्या कारवाया होत असून यामध्ये विशेषत: महसूल खात्यात तहसिलदार, तलाठी ते ग्रामसेवकांपर्यंत अनेक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकत आहेत. आता, पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केली आहे. धाराशिवमध्ये पोलीस निरीक्षकाला आरोपीकडून लाच घेताना पकडले. मात्र नजर चुकवून पोलिसाने पळ काढल्यामुळे या निरीक्षकाला पकडण्यासाठी लाचलुचपत विभागाने फिल्मी स्टाईल फंडा वापरला.
धाराशिवमधील ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारोती शेळके व महीला अमलदार मुक्ता लोखंडे यांनी आत्महत्या प्रकरणात गुन्हेगार असलेल्या एका आरोपीकडून कारवाई न करण्यासाठी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. १ लाख रुपयांपैकी ९५ हजार रुपये स्विकारताना पोलिस निरीक्षक शेळके सह महीला अमलदार यांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान पुढील कारवाईसाठी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात आणले असता पोलिस निरीक्षक मारोती शेळके यांनी स्थिचीचा अंदाज घेत अधिकाऱ्यांची नजर चुकवून संधी साधत कार्यालयातुन पळ काढला. त्यांना ताब्यात घेण्यासाठी छञपती संभाजी महाराज चौक,आर.पी कॉलेज रोड असा पाठलाग केला. पोलिसांनी शेळके यांना पकडण्यासाठी फिल्मी फंडा वापरून लेडीज क्लब जवळ पकडले. हा सर्व प्रकार सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.