पोलिसांचा गोळीबार सराव, नागरिकांच्या घरात घुसतायत गोळ्या; भीतीचे वातावरण! SaamTvNews
महाराष्ट्र

पोलिसांचा गोळीबार सराव, नागरिकांच्या घरात घुसतायत गोळ्या; भीतीचे वातावरण!

अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथे पोलीस करीत असलेला गोळीबार सराव हा कार्ले ग्रामस्थांच्या जीवावर बेतत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- राजेश भोस्तेकर

रायगड : अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथे पोलीस करीत असलेला गोळीबार सराव हा कार्ले ग्रामस्थांच्या जीवावर बेतत आहे. कार्ले गावातील मंगेश नाईक आणि प्रफुल्ल पाटील याच्या घरात दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान प्रत्येकी एक गोळी (Bullet) पडली आहे. यामध्ये कोणाला काही दुखापत झालेली नसली तरी वत्सला बाबू पाटील (72) या थोडक्यात बचावल्या आहेत. परहूरपाडा येथे सुरू असलेला पोलिसांचा गोळीबार (Firing) सराव बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा पावित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

हे देखील पहा :

अलिबाग (Alibag) पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत. चार वर्षापासून अशा घटना कार्ले गावात घडल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथे पोलिसांचा गोळीबार सराव क्षेत्र आहे. नवी मुंबई, ठाणे येथील पोलीस हे बंदुकीतून (Pistol) गोळीबार करण्याचा सराव करण्यासाठी परहूर पाडा येथे येत असतात. याआधीही कार्ले गावात अश्या गोळ्या येण्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस, जिल्हा प्रशासन यांना अनेक निवेदने दिली आहेत. त्यानंतर गोळीबार सराव येथे 20 फुटाची भिंत ही बांधली आहे. मात्र असे असले तरी सराव सुरू झाला की गोळ्या येण्यास सुरुवात झाली आहे.

आजही परहूर पाडा येथे पोलिसांचा (Police) सराव सकाळ पासून सुरू होता. दुपारी साडे बारा एक वाजण्याच्या सुमारास दोन डोंगर पार करून गोळी ही मंगेश नाईक यांच्या पत्र्यावरून घरातील मजल्यावरील एक इंच सिमेंट शीट मधून लादिवर पडली. तर दुसरी गोळी प्रफुल्ल पाटील यांच्या पत्र्यावरून भिंतीवर आपटून अंगणात जमिनीवर पडली. यावेळी प्रफुल्ल पाटील यांच्या आई ह्या भिंतीला टेकून बसल्या होत्या सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. गावात येत असलेल्या या गोळ्या नागरिकांच्या जीवावर उठल्या असल्याने याचा बंदोबस्त त्वरित करावा आणि सराव (Practice) पूर्ण पणे बंद करा अशी मागणी कार्ले ग्रामस्थांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT