Female police लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

दारु वाहतुकीसाठी लाच मागणाऱ्या महिला पोलिसांचा पर्दाफाश; लाचलूचपत पथकांनी पकडलं रंगेहात

या रोडने दारूची वाहतूक करायची असेल तर आम्हाला दर महिन्याला साडेपाच हजाराचा हप्ता द्यावा लागेल अशी मागणी करून विक्रेत्यास हे दोन महिला कर्मचारी वारंवार त्रास देत होते.

लक्ष्मण सोळुंके

जालना : नवीन जालना (Jalna) शहरातील एका अधिकृत परवानाधारक दुकानामध्ये बायपास रोड देशी दारूची वाहतूक केली जाते. ही दारूची वाहतूक कदीम जालना पोलीस ठाण्याची (Kadim Jalna Police Station) चौकी असलेल्या मस्तगड पोलीस चौकीच्या पोहेकाँ. वसंत रत्नपारखे आणि महिला पोलीस नाईक सुनिता कांबळे यांनी काही दिवसापूर्वी पकडली होती.

मात्र या रोडने दारूची वाहतूक (Transportation of Liquor) करायची असेल तर आम्हाला दर महिन्याला साडेपाच हजाराचा हप्ता द्यावा लागेल अशी मागणी करून विक्रेत्यास हे दोघे कर्मचारी वारंवार त्रास देत होते. हप्ता देण्याची इच्छा नसल्याने सदर दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Bribery Prevention Department) तक्रार केली होती.

आज साडेपाच हजार रुपयाची लाच घेताना मस्तगड पोलीस चौकीतच महिला पोलीस नाईक श्रीमती कांबळे यांना लाचलूचपत पथकांनी रंगेहात पकडण्यात अटक केलीय.महिला पोलिस कर्मचऱ्यासह लाच मागणाऱ्या फरार असलेल्या पोहेकाँ.रत्नपारखे यांच्या विरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT