अहमदनगर : श्रीरामपूर तालुका (Shrirampur Taluka) पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये अवैध धंदेवाल्यांकडून पैसे गोळा करण्याविषयी ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आहे. दोन दिवसापूर्वी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department) पैसे घेताना रंगेहात पकडले असताना दुसरीकडे तालुका पोलिसांचा हा नवा प्रताप समोर आला आहे.
श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साळवे हे राऊत पोलीस कर्मचारी यांना तुम्ही पुन्हा पैसे गोळा केले असे धमकावत आहेत. कलेक्शनचे काम वैरागर यांना देण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही तिकडे का जाता? अशी विचारणा करण्यात आली आहे.
पोलीस कर्मचारी राऊत हे आपण ते काम करत नाही. मात्र वैरागर यांनाही ते करू देऊ नये असे सांगतात त्यावर पोलिस निरीक्षक साळवे भलतेच रागवत राऊत यांना पोलीस ठाण्यात येण्याचे आदेश देतात वैरागर यांना कलेक्शन चे काम करू नये असे सांगणारे तुम्ही कोण? असा जाब पोलीस निरीक्षक साळवे हे राऊत यांना विचारताना ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये (Social Media) व्हायरल झाले आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.