police detect 13 chain robberies two arrested in nashik saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : नाशकातील सोनसाखळी चाेर जेरबंद, १३ गुन्हे उघडकीस

पोलीस पथकाने लाखलगाव परिसरात सापळा रचून केली कारवाई.

Siddharth Latkar

- तबरेज शेख

Nashik News :

सोनसाखळी चोरणाऱ्या दोन संशयितांना नाशिक शहर पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या (nashik crime branch unit 1) पथकाने लाखलगाव परिसरात अटक केली. या संशयितांकडून गावठी कट्टा, ६ जीवंत काडतुस, १९० ग्रॅम सोन्याची लगड असा १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Maharashtra News)

गुन्हे शाखा (युनिट एक) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले दोन व्यक्ती गावठी कट्टा विक्री करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर रोडवर येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी मुख्तार शेख यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने लाखलगाव परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. महेश जाधव आणि भारत उर्फ सोनू चावरे असे संशयितांचे नाव आहे. या संशयितांनी शहर आणि परिसरात १३ सोनसाखळ्या चोरल्याची कबूली दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यामध्ये उपनगर ६, नाशिकरोड २, म्हसरुळ २, पंचवटी आणि मुंबईनाका, इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी १ सोनसाखळी चोरी केल्याचे गुन्हे उघडकीस आले असून दोघांकडून आणखीन काही गुन्हेे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT