Sushma Andhare Saam TV
महाराष्ट्र

Jalgaon News : गुलाबराव पाटील तीन महिन्यांच्या बाळाला घाबरलेत; सुषमा अंधारेंचं टिकास्त्र

सभेसाठी आग्रह धरणाऱ्या उद्धव ठाकरे गट सेनेच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

साम टिव्ही ब्युरो

जळगावात : जळगावात (Jalgaon News) सुषमा अंधारे यांच्या सभेवरुन वातावरण तापलं आहे. मुक्ताईनगर महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांची सभा होणार होती. मात्र पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली आहे. यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सुषमा अंधारे थांबलेल्या हॉटेलमध्ये साध्या वेशात पोलीस उपस्थित आहेत. त्यामुळे सुषमा अंधारे पोलिसांच्या नजरेकैदेत आहेत का? असा सवालही उपस्थित होत होता. मी दहशतवादी नाही तरी माझ्या गाडीसमोर पोलिसांचा गराडा आहे. पोलिस मला जीवे मारणार नाही ना, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला.

सुषमा अंधारे या संपूर्ण प्रकाराबद्दल म्हटलं की, आम्ही जनतेच्या हिताचे जे प्रश्न विचारत आहोत, त्याची उत्तरे सरकारकडे नाहीत. मात्र माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तुम्ही किती वेळा माझा आवाज दाबाल. किती वेळा पोलीस स्टेशनला घेऊन जाल. मी प्रश्न विचारतेय पण उत्तरं देण्याऐवजी आवाज दाबताय. (Latest Marathi News)

गुलाबराव पाटील पालकमंत्री म्हणून सत्तेचा गैरवापर करत आहेत. एकीकडे मी शिवसेनेतील तीन महिन्याचं बाळ म्हणताय. पण याच तीन महिन्याच्या बाळाने तुमची झोप उडवली आहे. तुम्ही घाबरला आहात, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

सुषमा अंधारेंना परवानगी नाकारली तरी त्या सभा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. सभेसाठी आग्रह धरणाऱ्या उद्धव ठाकरे गट सेनेच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

जळगावात तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. मात्र, या सर्व घडामोडीनंतरही मुक्ताईनगर येथील नियोजित सुषमा अंधारे यांची सभा ही होणारच असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटेना, केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार, एकनाथ शिंदेंना २ ऑफर?

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra News : केंद्राचं महाराष्ट्राला गिफ्ट, २ रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

Viral Video: कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडीचा VIDEO पाहाच

Bhiwandi : भिवंडी गूढ धक्क्यांनी हादरली, भूकंप की आणखी काही, शहरात खळबळ

SCROLL FOR NEXT