जालन्यात गावठी हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

जालन्यात गावठी हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई

जालना शहरातील कैकाडी मोहल्ला भागात गेल्या अनेक वर्षांपासून गावठी दारूच्या हातभट्टीचा व्यवसाय राजरोसपणे सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना शहरातील कैकाडी मोहल्ला भागात गेल्या अनेक वर्षांपासून गावठी दारूच्या हातभट्टीचा व्यवसाय राजरोसपणे सुरु आहे. या ठिकाणी तयार करण्यात येणारी गावठी दारू चोरट्या मार्गाने जिल्ह्यात विकली जाते. अनेक वेळा पोलिसांकडून छापेमारी करत हे अड्डे उध्वस्त ही केले जातात. मात्र, पुन्हा हे अड्डडे सुरू करून दारू विकली जाते. शहरात आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सकाळी चार वाजेच्या सुमारास अड्डयावर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान हजारो लिटर रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले.

हे देखील पहा -

जिल्हा पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांच्याकडे कैकाडी मोहल्ला परिसरात अवैधरित्या गावठी दारू बनवण्याचा व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेतील वेगवेगळी पथके तयार करुन कैकाडी मोहल्यातील गावठी हातभट्टी तयार करुन विक्री करणा-यांवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक यांनी दिले होते.

त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी आज सकाळी चार वाजेच्या सुमारास कैकाडी मोहल्ला भागात काही इसम गावठी हातभट्टया लावुन दारुची चोरटी विक्री करीत आहेत, अशी माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पहाटे पाच वाजता पथकातील पोलिसांनी कैकाडी मोहल्ला भागातील वेगवेगळया ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करत बाळकृष्ण रघुनाथ शिंदे व तीन महिला त्यांच्या घरापाठीमागे मोकळया जागेत, हातभट्टीची दारु तयार करतानाआढळून आले.

आरोपी बाळकृष्ण रघुनाथ शिंदे या व्यक्तीसह तीन महिलांकडून सुमारे साडे तीन लाख रुपयांचे रसायन, प्लास्टिक व लोखंडी ड्रम, कॅन, चालु हातभट्टया व गावठी हातभट्टी दारु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बाळकृष्ण रघुनाथ शिंदे व तीन महिला आरोपी विरुद्ध कदीम पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदयाप्रमाणे (04) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील कदीम तपास पोलीस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT